TCS CEO Salary: टाटा समूहाची आयटी कंपनी TCS चे सीईओ आणि एमडी के. कृतीवासन यांचे वार्षिक सॅलरी पॅकेज समोर आले आहे. कंपनीने जारी केलेल्या ताज्या वार्षिक अहवालानुसार, वित्त वर्ष २०२५-२६ मध्ये कृतीवासन यांना तब्बल २८ कोटी रुपयांचे सॅलरी पॅकेज मिळाले. त्यांचे हे पॅकेज गेल्या वर्षाच्या तुलनेत ६.३ टक्क्यांनी जास्त आहे.
दुसरीकडे, टाटा समूह आणि टीसीएसचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी नेहमीप्रमाणे आपल्या साधेपणाची झलक दाखवली आहे. अहवालानुसार, चंद्रशेखरन यांनी कंपनीकडून कोणतेही कमिशन घेतले नाही. त्यांनी संपूर्ण आर्थिक वर्षात फक्त ४.२ लाख रुपये मीटिंग फी (मानधन) म्हणून घेतले आहेत.
२५ कोटींचे 'परफॉर्मन्स कमिशन'
मिळालेल्या माहितीनुसार, के. कृतीवासन यांची बेसिक सॅलरी १.६७ कोटी रुपये होती, तर त्यांना भत्ते व इतर सुविधा म्हणून १.४३ कोटी रुपये देण्यात आले. याशिवाय, त्यांच्या पगारातील सर्वात मोठा भाग परफॉर्मन्स कमिशनचा होता. त्यांना यासाठी तब्बल २५ कोटी रुपये मिळाले.
कर्मचाऱ्यांपेक्षा ३३२ पट अधिक पगार!
विशेष म्हणजे, देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीच्या सीईओंचा पगार हा टीसीएसच्या सामान्य कर्मचाऱ्यांच्या सरासरी पगारापेक्षा तब्बल ३३२.८ पट जास्त आहे. दरम्यान, या आर्थिक वर्षात टीसीएस कर्मचाऱ्यांच्या सरासरी पगारात ५.१ टक्क्यांची वाढ झाली आहे.
कर्मचाऱ्यांची पगारवाढ (Salary Hike) कशी राहिली?
अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कर्मचाऱ्यांना मिळालेली पगारवाढ खालीलप्रमाणे आहे:
ज्युनिअर आणि मिड लेव्हल कर्मचारी: सरासरी ४.५ टक्के ते ७.० टक्के पगारवाढ.
उत्कृष्ट कामगिरी करणारे कर्मचारी: १० टक्क्यांहून अधिक पगारवाढ.
Web Summary : TCS CEO Krithivasan's package soared to ₹28 crore, a 6.3% increase. His basic salary was ₹1.67 crore, supplemented by a ₹25 crore performance commission. Chairman Chandrasekaran took only ₹4.2 lakh in meeting fees. Average TCS employee salary increased by 5.1%.
Web Summary : टीसीएस सीईओ कृतिवासन का पैकेज 6.3% बढ़कर ₹28 करोड़ हो गया। उनका मूल वेतन ₹1.67 करोड़ था, जिसमें ₹25 करोड़ का प्रदर्शन कमीशन शामिल था। चेयरमैन चंद्रशेखरन ने केवल ₹4.2 लाख मीटिंग शुल्क लिया। टीसीएस कर्मचारियों के औसत वेतन में 5.1% की वृद्धि हुई।