Join us
Daily Top 2Weekly Top 5

टाटा मोटर्स प्रवासी वाहन व्यवसाय वेगळा करणार, प्रस्तावाला मिळाली मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 19:26 IST

Tata Motors : टाटा मोटर्सच्या प्रस्तावाच्या बाजूनं ९९ टक्के मतं

ठळक मुद्देटाटा मोटर्सच्या प्रस्तावाच्या बाजूनं ९९ टक्के मतंयापूर्वी मुकेश अंबानी यांनीदेखील आपली कंपनी वेगळी करण्याचा प्रस्ताव केला होता सादर

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजप्रमाणेच टाटा मोटर्सनंही आता आपली वेगळी कंपनी तयार करण्याची घोषणा केली आहे. रिलायन्स आणि टाटा या दोन्ही कंपन्या निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. टाटा मोटर्स ही भारतातील एक उत्तम कार उत्पादक कंपनी आहे. तर मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रिज प्रामुख्यानं नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम व्यवसायात आहे. काही दिवसांपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रिजनंदेखील आपल्या डिमर्जरची घोषणा केली होती. आता टाटा मोटर्सच्या शेअर होल्डर्सनं प्रवासी वाहन व्यवसाय वेगळा करण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. कंपनीच्या शेअर होल्डर्सनं टीएमएल बिझनेस अॅनालिटिक्स सर्व्हिसेज लि. ला स्थानांतरीत करण्यावर विचार करण्यासाठी आणि त्याला मंजुरी देण्याच्या बाजूनं मतदान केलं. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार त्यांचा प्रवासी वाहन व्यवसाय ९ हजार ४१७ कोटी रूपयांचा आहे. शेअर बाजाराला टाटा मोटर्सनं दिलेल्या माहितीनुसार २,१५,४१३८,३९२ मतांपैकी २,१५,३२,३९,२९४ मतं ही प्रस्तावाच्या बाजूनं तर ८९९,०९८ मतं ही प्रस्तावाच्या विरोधात मिळाली. प्रस्तावाच्या बाजूनं एकूण  ९९.९५८ टक्के मत मिळाली. कंपनी व्यवस्थापनानं दिलेल्या माहितीनुसार प्रवासी वाहन व्यवसाय वेगळा करण्याचं काम या वर्षाच्या मे ते जून महिन्यापर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे. परंतु त्यांनी व्यवसायाच्या संभावित भागीदारीबाबत कोणताही निर्णय घेतला नाही.

टॅग्स :टाटारिलायन्समुकेश अंबानीशेअर बाजार