Sun TV Network Ltd share falls: एकीकडे आज निवडणुकांचे निकाल लागत आहेत, तर दुसरीकडे तामिळनाडूच्या निवडणुकांच्या निकालांचे कल सन टीव्ही नेटवर्कच्या शेअर्ससाठी डोकेदुखी ठरताना दिसताहेत. सन टीव्ही नेटवर्क लिमिटेडच्या शेअर्समध्ये आज ९ टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली. सुरुवातीच्या कलांमध्ये डीएमके राज्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर घसरताना दिसली. तर दुसरीकडे अभिनेता थलापति विजय यांचा पक्ष टीव्हीके पहिल्या क्रमांकावर आहे.
ऑगस्ट २०२४ नंतरची सर्वात मोठी घसरण
बीएसईवर आज सन टीव्ही नेटवर्कचा शेअर ६१२.९५ रुपयांवर उघडला होता. कामकाजादरम्यान हा शेअर ९ टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होता. ऑगस्ट २०१४ नंतरची सन टीव्हीच्या शेअरची ही एका दिवसातली सर्वात मोठी घसरण आहे. सन टीव्हीचा मालकी हक्क कमलनिधि मारन यांच्याकडे आहे. मारन कुटुंब डीएमकेचे एम करुणानिधि यांचे निकटवर्तीय मानले जातात.
कशी होती आजवरची कामगिरी?
गेल्या ५ वर्षांमध्ये डीएमके तामिळनाडूमध्ये सत्तेत होती. यादरम्यान सन टीव्हीच्या शेअर्समध्ये सामान्य तेजी पाहायला मिळाली होती. २०२१ मध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये ४ टक्क्यांची तेजी होती. तर २०२२ मध्ये स्टॉक ३ टक्क्यांनी घसरला होता. २०२४ मध्ये यात ४ टक्के आणि २०२५ मध्ये यात १४ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. २०२३ मध्ये सन टीव्हीच्या शेअर्सची किंमत ४६ टक्क्यांनी वाढली होती.
शेअरची दीर्घकाळातील कामगिरी कशी?
गेल्या ५ वर्षांमध्ये सन टीव्ही नेटवर्कच्या शेअर्सच्या किमतीत १३ टक्क्यांची तेजी दिसून आली. तर १० वर्षांमध्ये या शेअरनं ५७ टक्क्यांचा रिटर्न दिलाय.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Sun TV Network shares plummeted over 9% amid election results, with DMK's decline and actor Vijay's party's rise impacting investor sentiment. This marks the stock's biggest single-day fall since August 2014, despite its past performance.
Web Summary : चुनाव नतीजों के बीच सन टीवी नेटवर्क के शेयरों में 9% से अधिक की गिरावट आई, डीएमके की गिरावट और अभिनेता विजय की पार्टी के उदय का असर निवेशकों पर दिखा। अगस्त 2014 के बाद स्टॉक में यह सबसे बड़ी गिरावट है।