Join us

शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 10:02 IST

Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात शुक्रवारी घसरणीसह झाली. सेन्सेक्स २०० अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता.

Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात शुक्रवारी घसरणीसह झाली. सेन्सेक्स २०० अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. तर निफ्टी २५,००० च्या पातळीच्या किंचित खाली घसरताना दिसला. कामकाजादरम्यान भारती एअरटेल, इंडसइंड बँक, इन्फोसिस या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण नोंदवण्यात आली. आयशर मोटर्स, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय, सिप्ला, कोल इंडिया या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले. आयटी, फार्मा, हेल्थकेअर आणि खासगी बँक निर्देशांक घसरले. कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि फायनान्शिअल शेअर्स सर्वात मजबूत दिसून आले.

बाजाराची सुरुवात मंदावल्यानंतर सेन्सेक्स ८२,३९२ वर उघडला, जो मागील बंद आकड्यांच्या तुलनेत १३८ अंकांनी कमी होता, त्यानंतर घसरण वाढली. निफ्टी २ अंकांनी वाढून २५,०६४ वर उघडला. बँक निफ्टी ७९ अंकांनी वाढून ५५,२७६ वर उघडला आणि रुपया २४ पैशांनी मजबूत होऊन ८५.३१/ डॉलरवर वर उघडला.

मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?

काल अमेरिकन बाजारांमध्ये जोरदार तेजी दाखवली. डाऊ ५५० अंकांच्या वाढीसह २७० अंकांनी वधारून दिवसाच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला, तर सलग ६ दिवस चढल्यानंतर नॅसडॅक ३५ अंकांनी घसरला. अमेरिकेत सध्या व्याजदरात कपात होण्याची कोणतीही आशा नाही. फेडचे चेअरमन पॉवेल यांनी अस्थिर धोरणांमुळे व्याजदर दीर्घकाळ अधिक राहू शकतात, असं म्हटलं.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक