शेअर बाजारातील शक्ती पंप्सच्या शेअरला गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही ५ टक्क्यांचे अप्पर लागले आणि तो ८७४ रुपयांवर बंद झाला. खरे तर, एका ऑर्डरमुळे या शेअरमध्ये ही तेजी दिसून आली आहे. कंपनीला पीएम-कुसुम योजनेच्या घटक-B अंतर्गत महाराष्ट्र ऊर्जा विभाग एजन्सीकडून 877 सौर फोटोव्होल्टिक जल पंपिंग सिस्टिमच्या (एसपीडब्ल्यूपीएस) पुरवठ्यासाठी 24 कोटी रुपयांची नवीन ऑर्डर मिळाली आहे.
या प्रकल्पाच्या व्याप्तीमध्ये महाराष्ट्रातील ८७७ एसपीडब्ल्यूपीएस युनिट्सची रचना, उत्पादन, पुरवठा, वाहतूक, स्थापना, परीक्षण आणि ते कार्यान्वित करणे आदींचा समावेस आहे. कंपनीला कार्यादेश जारी झाल्यापासून १२० दिवसांच्या आत काम पूर्ण करणे अपेक्षित आहे.
शक्ति पंप्स पंप, मोटर आणि स्पेअर पार्ट्सच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. हिच्या मुख्य उत्पादनात इंजिनियर पंप, औद्योगिक पंप आणि सौर पंपाचा समावेश आहे. नुकत्याच संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत, वार्षिक आधारावर कंपनीचा निव्वळ नफा १३० टक्क्यांनी वाढून १०४ कोटी रुपये झाला, तर ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल ३१ टक्क्यांनी वाढून ६४८.८ कोटी रुपये झाला आहे.
कंपनीचा शेअर -गेल्या तीन महिन्यांत, शक्ती पंप्सचा शेअर १४ टक्क्यांनी वधारला आहे. हा शेअर बेंचमार्क निफ्टी 50 पेक्षा चांगले प्रदर्शन करत आहे. हा शेअर गेल्या वर्षभरात 310% पर्यंत वधारला आहे. या कालावधीत या शेअरची किंमत 213 रुपयांवरून सध्याच्या किंमतीवर आली आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)