Join us

लिस्टिंग होताच झुनझुनवाला फॅमिली मालामाल...! झाला 530 पट नफा; पहिल्याच दिवशी शेअर 46% वधारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 19:22 IST

महत्वाचे म्हणजे, या शेअरने किरकोळ गुंतवणूकदारांबरोबरच अब्जाधीश झुनझुनवाला कुटुंबालाही मोठा नफा मिळवून दिला आहे. झुनझुनवाला कुटुंबाला 530 पटीपर्यंत मल्टीबॅगर परतावा मिळाला आहे...

हेल्थटेक फर्म इन्व्हेंटुरस नॉलेज सॉल्यूशंस (Inventurus Knowledge Solutions (IKS)) चा शेअर्स गुरुवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. कंपनीचा शेअर बीएसई आणि एनएसईवर लिस्ट झाले आहे. हा शेअर बीएसईवर 39.65 टक्क्यांच्या वाढीसह 1,856 रुपयांवर लिस्ट झाला. यानंतर तो 46.13 टक्क्यांनी वाढून 1,942.10 रुपयांवर पोहोचला. NSE वर तो 42.96 टक्क्यांच्या उसळीसह 1,900 रुपयांवर खुला झाला. त्याचा प्राइस बँड 1329 रुपये होती. महत्वाचे म्हणजे, या शेअरने किरकोळ गुंतवणूकदारांबरोबरच अब्जाधीश झुनझुनवाला कुटुंबालाही मोठा नफा मिळवून दिला आहे. झुनझुनवाला कुटुंबाला 530 पटीपर्यंत मल्टीबॅगर परतावा मिळाला आहे.

आयपीओ डिटेल -इन्व्हेंटुरस नॉलेज सॉल्यूशंस लिमिटेडचा आयपीओ सोमवारी बोली लावण्याच्या शेवटच्या दिवशी 52.68 वेळा सबस्क्राइब झाला. हा इश्यू 12 ते 16 डिसेंबर या कालावधीत गुंतवणुकीसाठी खुला होता. या माध्यमाने कंपनीने मोठ्या (अँकर) गुंतवणूकदारांकडून 1,120 कोटी रुपये उभे केले होते. यांच्या 2,498 कोटी रुपयांच्या IPO साठी प्राइस बँड 1,265-1,329 रुपये प्रति शेअर होता. IPO मध्ये, दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या आर्यमन, आर्यवीर आणि निष्ठा या तिन्ही मुलांशी संबंधित ट्रस्ट्सने सप्टेंबर तिमाहीच्या अखेरीस त्यांच्या 8.94 कोटी शेअर्सपैकी एकूण 33,57,900 शेअरर्सची विक्री केली होती.

रेखा झुनझुनवाला यांना तगडा परतावा - याशिवाय रेखा झुनझुनवाला यांचीही कंपनीत 0.23% भागीदारी आहे. त्यांनी IPO मध्ये एकही स्टॉक विकला नाही, जो पूर्णपणे प्रमोटर समूह आणि इतर विद्यमान शेअरधारकांद्वारे विक्रीसाठी ऑफर (OFS) होता. कंपनीमध्ये झुनझुनवालासाठी नेमकी खरेदी किंमत RHP वरून समजू शकलेली नाही. मात्र ET Now च्या मते, कुटुंबाला IPO मध्ये 530 पट जबरदस्त परतावा मिळाला आहे. 

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

टॅग्स :रेखा झुनझुनवालाशेअर बाजारगुंतवणूकपैसा