Join us

शेअर बाजारातील तेजीचा अदानींना फायदा, कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; तुमच्याकडे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 15:04 IST

Adani Power Stocks: शेअर बाजारात जशी पुन्हा तेजी येत आहे, तशी अदानी  समूहाच्या शेअर्समध्येही उसळी दिसून येत आहे. समूहाच्या सर्व लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

Adani Power Stocks: शेअर बाजारात जशी पुन्हा तेजी येत आहे, तशी अदानी  समूहाच्या शेअर्समध्येही उसळी दिसून येत आहे. समूहाच्या सर्व लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अदानी पॉवर ४.०८ टक्क्यांनी वधारून ५०२.९५ रुपयांवर पोहोचला. गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत आता अदानी समूहाचा शेअर आता तेजीच्या मार्गावर परतला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजनं अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये २४% जास्त वाढ होण्याची शक्यता व्यक्त केलीये.

आयसीआयसीआय सिक्युरिटीजनं 'बाय' रेटिंगसह अदानी पॉवरच्या शेअर्सचे कव्हरेज पुन्हा सुरू केलं आहे. अदानी पॉवरच्या शेअरवर कंपनीनं ६०० रुपयांचं टार्गेट प्राईज ठेवलं आहे. हे मंगळवारच्या बंद किमतीच्या तुलनेत २४ टक्क्यांनी अधिक आहे.

अदानी ग्रीनची स्थिती काय?

अदानी ग्रीनचा शेअर कामकाजादरम्यान ७.६७ टक्क्यांनी वधारला असून तो ८२७.५० रुपयांवर पोहोचला आहे. समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा शेअरही ४.१९ टक्क्यांनी वधारून २२३४.७० रुपयांवर पोहोचलाय.

अदानी एनर्जी सोल्युशनमध्येही तेजी

अदानी पोर्ट्सचा शेअर ४.८६ टक्क्यांनी वधारला असून तो ११०९.३५ रुपयांवर पोहोचला आहे. अदानी विल्मर ६ टक्क्यांहून अधिक वधारला आहे. हा शेअर कामकाजादरम्यान २५४.३८ रुपयांवर व्यवहार करत होता. अदानी एनर्जी सोल्यूशन्सचा शेअर आता ७.७० टक्क्यांच्या बंपर वाढीसह ६९६.४५ रुपयांवर व्यवहार करत होता.

अदानी टोटल गॅस ५.४२ टक्क्यांनी वधारून ५७६.८० रुपयांवर व्यवहार करत होता. एसीसी १.११ टक्क्यांनी वधारून १,८४९.१५ रुपयांवर आणि अंबुजा सिमेंट २.३२ टक्क्यांनी वधारून ४८६ रुपयांवर व्यवहार करत होता. एनडीटीव्हीचा शेअर ५.५९ टक्क्यांनी वधारून ११९.९५ रुपयांवर ट्रेड करत होता.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :अदानीगौतम अदानीशेअर बाजार