Small Business Ideas : दिवसभर नोकरी करून थकल्यानंतर अनेकदा मनात येतं की, स्वतःचा एखादा छोटासा व्यवसाय असावा. पण 'व्यवसाय म्हणजे लाखांची गुंतवणूक' या गैरसमजामुळे अनेकजण पाऊल मागे घेतात. जर तुमच्याकडे जिद्द आणि कल्पकता असेल, तर अवघ्या १० हजार रुपयांच्या आत तुम्ही दर्जेदार व्यवसाय सुरू करू शकता. डिजिटल इंडियाच्या युगात कमी भांडवलात मोठे साम्राज्य उभे करण्याची संधी आज उपलब्ध आहे.
१. घरगुती लोणचे आणि मसाले उद्योगजर तुमच्या हातात चवीची जादू असेल, तर हा व्यवसाय तुमच्यासाठी 'सोनं' ठरू शकतो. अवघ्या ५ ते ७ हजार रुपयांत साहित्याची खरेदी करून तुम्ही हा उद्योग सुरू करू शकता. आजकाल बाजारात 'होममेड' आणि केमिकलमुक्त पदार्थांना मोठी मागणी आहे. योग्य मार्केटिंग केल्यास यातून दरमहा ३० ते ४० हजार रुपये सहज कमावता येतात.
२. क्लाउड किचनहॉटेल किंवा दुकान भाड्याने घेण्याचे टेन्शन न घेता तुम्ही घरच्या किचनमधूनच हा व्यवसाय करू शकता. स्विगी आणि झोमॅटो सारख्या प्लॅटफॉर्मशी हातमिळवणी करून तुम्ही घरपोच जेवण देऊ शकता. चव आणि स्वच्छता जपली, तर हा व्यवसाय शहरांमध्ये प्रचंड वेगाने विस्तारतो.
३. मोबाईल रिपेअरिंग सेंटरआजच्या काळात मोबाईल ही प्रत्येकाची गरज आहे. जर तुम्हाला तंत्रज्ञानाची थोडीफार जाण असेल, तर छोटासा कोर्स करून तुम्ही मोबाईल रिपेअरिंगचे काम सुरू करू शकता. यासाठी मोठ्या जागेची गरज नसते, एका छोट्या टेबलावरूनही काम सुरू करता येते. एकदा का तुमचे नाव झाले की, तुम्ही शासकीय फॉर्म भरणे किंवा रिचार्ज सारख्या सेवा जोडून उत्पन्न वाढवू शकता.
४. पर्सनलाईज्ड गिफ्टिंगहल्ली सण, वाढदिवस किंवा खास प्रसंगी 'कस्टमाइज्ड' गिफ्ट देण्याची क्रेझ आहे. मग, टी-शर्ट प्रिंटिंग किंवा हाताने बनवलेल्या शो-पीस वस्तू तुम्ही बनवू शकता. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही या वस्तूंची विक्री करून दरमहा चांगला नफा मिळवू शकता.
५. कंटेंट क्रिएशन आणि फ्रीलान्सिंगतुमच्याकडे लिहिण्याची कला असेल किंवा तुम्ही व्हिडिओ बनवण्यात माहीर असाल, तर हा 'झिरो इन्व्हेस्टमेंट' व्यवसाय आहे. दिवसाचे ७-८ तास दिल्यास आणि सातत्य ठेवल्यास तुम्ही कंटेंट रायटिंग किंवा व्हिडिओ क्रिएशनमधून ३० ते ५० हजार रुपये कमवू शकता. यासाठी फक्त लॅपटॉप किंवा एका चांगल्या स्मार्टफोनची गरज असते.
वाचा - होम लोन घेताय? बँकेकडून १००% कर्ज का मिळत नाही? वाचा आरबीआयचे नियम
गुंतवणुकीचा आणि उत्पन्नाचा अंदाज
| व्यवसायाचा प्रकार | अंदाजित गुंतवणूक | संभाव्य मासिक उत्पन्न |
| लोणचे/मसाले उद्योग | ५,००० - ७,००० | ३०,००० - ४०,००० |
| क्लाउड किचन | ८,००० - १०,००० | ४०,०००+ |
| मोबाईल रिपेअरिंग | ५,००० - १०,००० | २०,००० - ३०,००० |
| कंटेंट क्रिएशन | ० - ५,००० | ३५,००० - ५०,००० |
Web Summary : Start a small business with minimal investment. Options include homemade pickles/spices, cloud kitchen, mobile repair, personalized gifting, or content creation. Earn up to ₹50,000 monthly.
Web Summary : कम निवेश में छोटा व्यवसाय शुरू करें। विकल्पों में घरेलू अचार/मसाले, क्लाउड किचन, मोबाइल रिपेयरिंग, पर्सनलाइज्ड गिफ्टिंग या कंटेंट क्रिएशन शामिल हैं। हर महीने ₹50,000 तक कमाएं।