SpiceJet Layoffs: देशातील प्रमुख विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या SpiceJet समोर गंभीर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. यामुळेच कंपनीने खर्च कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेत सुमारे २० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच काही कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात वेतनाशिवाय रजेवर पाठवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
६,८०० कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
सध्या कंपनीत सुमारे ६,८०० कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी अनेकांवर छाटणीची टांगती तलवार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाणार असून, केबिन क्रू, ग्राउंड स्टाफ आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर याचा परिणाम होऊ शकतो.
विमानांची संख्या घटली
कंपनीच्या ताफ्यात सध्या केवळ १३ विमाने उरली आहेत. त्यात १० बोईंग आणि ३ Q400 विमानांचा समावेश आहे. याशिवाय, १४ विमाने लीजवर चालवली जात आहेत. ताफ्यातील घट ही कंपनीच्या अडचणींचे आणखी एक संकेत मानली जात आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वेतन थकीत
आर्थिक अडचणींमुळे कंपनीने काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे २ ते ३ महिन्यांचे वेतन थकवले आहे. तसेच TDS आणि PF मिळून ₹१०० कोटींहून अधिक रक्कम थकीत असल्याची माहिती समोर आली आहे.
कर्जाचा बोजा वाढला
स्पाइसजेटवर मोठ्या प्रमाणात कर्ज असून, अलीकडेच इंग्लड कोर्टाने विमान भाडेपट्टा वादात कंपनीला सुमारे ₹६८ कोटी भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे कंपनीच्या आर्थिक अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. तसेच एप्रिल २०२५ पासून कंपनीने TDS आणि GST जमा केले नसल्याचेही समोर आले आहे. या परिस्थितीमुळे कंपनीतील कर्मचारी आणि पायलट्समध्ये अस्वस्थता वाढली आहे.
Web Summary : SpiceJet is grappling with a severe financial crunch, prompting layoffs of approximately 20% of its workforce. The airline's fleet has shrunk, senior staff salaries are delayed, and significant debt burdens persist, creating unease among employees and pilots.
Web Summary : SpiceJet गंभीर वित्तीय संकट से जूझ रही है, जिसके कारण लगभग 20% कर्मचारियों की छंटनी हो रही है। एयरलाइन का बेड़ा सिकुड़ गया है, वरिष्ठ कर्मचारियों के वेतन में देरी हो रही है, और महत्वपूर्ण कर्ज का बोझ बना हुआ है, जिससे कर्मचारियों और पायलटों में बेचैनी है।