OpenAI CEO Sam Altman : सध्या सगळीकडे चॅट जीपीटी आणि एआयची चर्चा आहे. तुमच्याही कानावर कधी ना कधी ही नावं पडली असेल किंवा तुम्ही याचा वापरही करत असाल. याच संबंधात आता मोठी बातमी समोर आली आहे. चॅट जीपीटी डेव्हलप करणारी कंपनी ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्यावर त्यांच्याच बहिणीने लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले आहेत. ऑल्टमनच्या बहिणीने त्याच्याविरुद्ध फेडरल कोर्टात दावा दाखल केला आहे. या घटनेनंतर टेक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
याचिकेत, ऑल्टमनवर सुमारे १० वर्षांपासून लैंगिक शोषणाचा आरोप आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, ३० वर्षीय ॲनी ऑल्टमनने आरोप केला आहे की सॅमने १९९० सालापासून २००० पर्यंत मिसूरीमध्ये तिचे शोषण केले. सोमवारी सॅमविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहेत आरोप?अॅनीने याचिकेत लिहिलंय, की "मी ३ वर्षांची असल्यापासून सॅम माझे लैंगिक शोषण करत होता. जेव्हा शेवटची घटना घडली तेव्हा सॅम प्रौढ होता तर मी अल्पवयीन होते. अॅनीने यापूर्वीच सोशल मीडियावर सॅमने तिचे शोषण केल्याचा दावा केला होता.
सॅम ऑल्टमनकडून स्पष्टीकरणअॅनीच्या आरोपानंतर ३९ वर्षीय सॅम ऑल्टमनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक निवेदन जारी करुन स्पष्टीकरण दिलंय. पोस्टमध्ये अॅनीचे सर्व आरोप फेटाळले आहेत. “आमचे संपूर्ण कुटुंब या आरोपांमुळे व्यथित झाले आहे. सॅम ऑल्टमन म्हणाले, "अॅनी आमच्याकडे अधिक पैसे मागत आहे. गेल्या काही वर्षांत आम्ही अॅनीला उभं करण्यासाठी अनेक मार्गांनी प्रयत्न केले आहेत."
बहिणीला द्यायचा आर्थिक पाठबळसॅम म्हणाला, आम्ही अॅनी खूप आर्थिक मदत दिली. तिची बिले थेट भरली, घरभाडे दिले, स्वतःच्या पायावर उभ करण्यासाठी प्रयत्न केले. वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न केला. ट्रस्टच्या माध्यमातून तिला घर खरेदी करण्याची ऑफर दिली होती. एवढेच काय आमच्या दिवंगत वडिलांच्या इस्टेटमधून तिला मासिक आर्थिक सहाय्य मिळते, जे तिच्या आयुष्यभर चालू राहील अशी आमची अपेक्षा आहे." निवेदनात पुढे असे लिहिले आहे की, "तिच्या आणि खासगी आयुष्याचा आदर करून आम्ही सार्वजनिकपणे प्रतिक्रिया देणे टाळले आहे." पण, तिने आता कायदेशीर पाऊल उचलल्याने आम्हाला बोलायला भाग पाडले आहे.