Join us

फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 21:51 IST

SIP Investment Benefits : एसआयपीमध्ये गुंतवणूक करून, लोक शेअर बाजारातील चढउतारांचा मोठा धोका टाळत आहेत. फक्त २००० रुपयांच्या मासिक एसआयपी तुम्हाला १ कोटींचा निधी देऊ शकते.

SIP Investment Benefits : गेल्या वर्षभरापासून शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत आहे. बाजारातील तीव्र चढ-उतारांच्या भीतीने अनेक गुंतवणूकदारांनी सध्या एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा आजच्या काळात असा एक सोपा मार्ग बनला आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही केवळ २००० रुपयांची मासिक एसआयपी करून करोडपती बनू शकता. तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर चक्रवाढ व्याजाची जादू कशी काम करते आणि केवळ २००० रुपयांच्या गुंतवणुकीतून १ कोटी रुपये कसे मिळतील, याचे संपूर्ण गणित आज आपण समजून घेऊया. 

किती वर्षांत तुम्ही बनाल करोडपती?जर तुम्ही कोणत्याही चांगल्या म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये दरमहा २००० रुपये जमा केले आणि तुम्हाला दीर्घकाळात सरासरी १२% वार्षिक परतावा मिळाला (हा परतावा बाजारातील अंदाजित परताव्यावर आधारित आहे), तर तुमचा फंड खालीलप्रमाणे वाढेल.

कालावधी तुमची एकूण गुंतवणूक (अंदाजेअंदाजित एकूण मूल्य (₹१२% परतावा) 
१० वर्षे२.४० लाख रुपये ४.६५ लाख रुपये 
२० वर्षे ४.८० लाख रुपये १९.९६ लाख रुपये 
३० वर्षे ७.२० लाख रुपये ६९.८६ लाख रुपये 
३२ वर्षे ७.६८ लाख रुपये १.०२ कोटी (करोडाहून अधिक) 

(टीप: वरील आकडेवारी १२% वार्षिक परताव्यावर आधारित असून, बाजारातील स्थितीनुसार परतावा बदलू शकतो.)

फक्त ८ लाखांत मिळतील १ कोटी!फक्त २००० रुपयांची मासिक एसआयपी तुम्ही ३२ वर्षे नियमितपणे चालू ठेवल्यास, तुमची एकूण गुंतवणूक फक्त ७.६८ लाख रुपये इतकी होईल.पण कंपाऊंडिंगच्या ताकदीमुळे याच ७.६८ लाख रुपयांचे मूल्य १ कोटींहून अधिक होईल.याचा अर्थ तुम्हाला सुमारे ९२ लाख रुपयांपेक्षा जास्त निव्वळ नफा मिळेल. ही आहे एसआयपी आणि चक्रवाढ व्याजाची खरी जादू!

काय असते एसआयपी?एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. हा गुंतवणुकीचा एक असा मार्ग आहे, ज्यात तुम्ही दर महिन्याला एक छोटी रक्कम म्युच्युअल फंडात शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवत राहता.एसआयपीचा सर्वात मोठा फायदा हा आहे की तुम्ही अगदी कमी रकमेपासून (उदा. ५०० किंवा १००० रुपये) सुरुवात करू शकता आणि दीर्घकाळ नियमित गुंतवणूक करून मोठा फंड तयार करू शकता.

जाणून घ्या कंपाऊंडिंगचे सोपे गणितकंपाऊंडिंग म्हणजेच चक्रवाढ व्याज हा गुंतवणुकीतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता आणि त्यावर तुम्हाला व्याज मिळते, तेव्हा पुढच्या वेळी मिळणारे व्याज केवळ तुमच्या मूळ जमा रकमेवरच नव्हे, तर मागील वेळी मिळालेल्या व्याजावरही मिळते. ही प्रक्रिया वारंवार होत राहते, ज्यामुळे तुमचा पैसा खूप वेगाने वाढतो.

उदाहरणार्थ: तुम्ही १००० रुपये गुंतवले आणि त्यावर १०% व्याज मिळाले, तर पहिल्या वर्षी ते ११०० रुपये होतील. दुसऱ्या वर्षी १०% व्याज १००० रुपयांवर न लागता ११०० रुपयांवर लागेल, ज्यामुळे ती रक्कम १२१० रुपये होईल. अशा प्रकारे प्रत्येक वर्षी तुमच्या 'व्याज + मूळ रक्कम' यावर व्याज मिळत राहते.

वाचा - आठवड्याची सुरुवात तेजीने! सेन्सेक्स-निफ्टी किरकोळ वाढीसह बंद; मारुती सुझुकी ३% हून अधिक घसरला

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : ₹2000 SIP Can Make You a Crorepati: Understand Compounding

Web Summary : Start a ₹2000 monthly SIP in a good mutual fund. Over 32 years, with 12% returns, your ₹7.68 lakh investment can grow to over ₹1 crore, thanks to compounding.
टॅग्स :गुंतवणूकशेअर बाजारस्टॉक मार्केटपैसा