Gold Silver Rate Today 20 Jan 2026: सोन्या-चांदीचे भाव आज आणखी एका नव्या शिखरावर पोहोचले आहेत. सोमवारच्या बंद दराच्या तुलनेत आज चांदी एका झटक्यात १०,८८८ रुपयांनी वधारली, तर सोनं २,४२९ रुपयांनी महागलं. जीएसटीसह चांदीचा भाव आता ३.१४ लाख रुपये प्रति किलोच्या पार गेला. तर दुसरीकडे, २४ कॅरेट सोन्याचा दर आता जीएसटीसह १,५०,७६६ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे.
या वर्षात केवळ २० दिवसांत चांदी ७४,४४३ रुपयांनी महागली आहे, तर सोन्याच्या भावात १३,१८० रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजेच यावर्षी चांदीचा वेग सोन्याच्या तुलनेत सुमारे सहा पटीने जास्त आहे.
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, मिळणार सरकारची गॅरेंटी
आज चांदीचा भाव जीएसटीशिवाय ३,०४,८८६ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. जीएसटीशिवाय सोन्याचे भाव आज १,४६,३७५ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडले. सोमवारी चांदी जीएसटीशिवाय २,९३,९७५ रुपयांवर बंद झाली होती, तर सोने जीएसटीशिवाय १,४३,९४६ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले होते. हे दर आयबीजेए (IBJA) द्वारे जारी करण्यात आले आहेत. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते; एकदा दुपारी १२ च्या सुमारास आणि दुसरे संध्याकाळी ५ च्या सुमारास दर जाहीर केले जातात.
कॅरेटनुसार सोन्याचे भाव
२३ कॅरेट गोल्ड: आज २,२१९ रुपयांनी वधारून १,४५,७८९ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडले. जीएसटीसह याची किंमत आता १,५०,१६२ रुपये झाली आहे. यामध्ये अद्याप मेकिंग चार्ज जोडलेला नाही.
२२ कॅरेट गोल्ड: २,२२५ रुपयांनी महाग होऊन १,३४,०८० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. जीएसटीसह हा भाव १,३८,१०२ रुपये आहे.
१८ कॅरेट गोल्ड: १८ कॅरेट सोन्यात १,८२१ रुपयांची वाढ झाली असून ते १,०९,७८१ रुपयांवर उघडले. जीएसटीसह याची किंमत १,१३,०७४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे.
१४ कॅरेट गोल्ड: १४ कॅरेट सोन्याचा दर १,४२१ रुपयांनी वाढून ८४,२२७ रुपयांवर उघडला आणि जीएसटीसह हा भाव ८८,१९७ रुपयांवर आला.
आंतरराष्ट्रीय बाजारातही विक्रम
आंतरराष्ट्रीय स्तरावरही सोन्याच्या किमतींनी विक्रमी उच्चांक गाठला आहे. अमेरिकेत सोन्याच्या फेब्रुवारी डिलिव्हरीच्या फ्युचर्समध्ये सुमारे २% वाढ होऊन ते ४,६८१ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करू लागले आहे.
भू-राजकीय तणाव हे मुख्य कारण
सोन्याला मोठी पसंती मिळत आहे कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आठ युरोपीय देशांवर टॅरिफ लावण्याची धमकी दिलीये, ज्याला युरोपीय देशांनी प्रत्युत्तर देण्याची भाषा केली आहे. ट्रम्प ग्रीनलँडबाबतच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. जर युरोपीय देशांनी प्रत्युत्तरादाखल पावलं उचलली, तर अमेरिका आणि युरोप या जगातील दोन मोठ्या आर्थिक शक्तींमध्ये मोठं व्यापार युद्ध सुरू होऊ शकतं. सध्या चीन, भारत आणि युरोपसह अनेक मोठ्या अर्थव्यवस्थांवर अमेरिकन टॅरिफ लागू आहेत.
तज्ज्ञांचं मत
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे (IBJA) उपाध्यक्ष अक्ष कंबोज यांनी सांगितलं की, अमेरिका आणि युरोपमधील वाढत्या व्यापार तणावामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. जोपर्यंत भू-राजकीय अनिश्चितता कायम राहील, तोपर्यंत सोने उच्चांकी पातळीवर राहण्याची अपेक्षा आहे. चांदीला सोन्याच्या मजबुतीसोबतच गुंतवणुकीच्या मागणीचाही पाठिंबा मिळत आहे.
डॉलरमधील घसरणीचा परिणाम
डॉलर निर्देशांकात (Dollar Index) सुमारे अर्धा टक्का घट झाली आहे, ज्यामुळे इतर चलन धारकांसाठी डॉलर-आधारित सोनं खरेदी करणं स्वस्त झालंय.
Web Summary : Gold and silver prices hit new highs. Silver jumped ₹10,888, gold rose ₹2,429. Geopolitical tensions and a weaker dollar drive demand. Silver's yearly gain significantly outpaces gold's. Experts predict continued high prices amid uncertainty.
Web Summary : सोने और चांदी की कीमतें नई ऊंचाइयों पर पहुंचीं। चांदी ₹10,888 बढ़ी, सोना ₹2,429 बढ़ा। भू-राजनीतिक तनाव और कमजोर डॉलर मांग को बढ़ा रहे हैं। चांदी की वार्षिक वृद्धि सोने से काफी अधिक है। विशेषज्ञों को अनिश्चितता के बीच कीमतों में वृद्धि की उम्मीद है।