शेअर बाजारात बुधवारचा दिवस संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांसाठी खास ठरला. गेल्या ७ महिन्यांत संरक्षण क्षेत्रातील कोचीन शिपयार्डचा शेअर जवळपास ६० टक्क्यांनी घसरला. मात्र गुरुवारी, हा शेअर गुंतवणूकदारांना खुश करण्यात यशस्वी ठरला. या शेअरची किमतीत ९ टक्क्यांहून अधिकने वाधारली. हा शेअर १२२९.९५ रुपयांच्या पातळीवर खुला झाला होता. यानंतर, दिवसभरात हा शेअर १३४९ रुपयांच्या इंट्रा-डे उच्चांकावर पोहोचला.
संरक्षण क्षेत्रातील या कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी -हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL), भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), गार्डन रीच शिपयार्ड लिमिटेड यांच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली. भारत डायनॅमिक्स लिमिटेडचा शेअर ९ टक्क्यांनी, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा शेअर २ टक्क्यांनी, तर गार्डन रीचचा शेअर १५ टक्क्यांनी वधारला आहे.
संरक्षण क्षेत्रातील या शेअरवर एक्सपर्ट्स बुलिश -हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला कव्हर करणाऱ्या १६ पैकी १५ ब्रोकर्सनी बाय रेटिंग दिले आहे. तर एकाने विकण्याचा सल्ला दिला आहे. भारत डायनॅमिक्स लिमिटेडला कव्हर करणाऱ्या २७ एक्सपर्ट्स पैकी २४ ने खरेदीचा सल्ला दिला आहे, तर ३ जणांनी विक्रीचा सल्ला दिला आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)