Join us

Share Market: शेअर मार्केटमध्ये गुंतवले 1 लाख, फेव्हीकॉल कंपनीनं केलं मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 13:27 IST

पिडिलाइट इंडस्ट्रीजचे शेअर्स 27 मार्च 2009 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मध्ये 41.98 रुपये एवढे होते

मुंबई - फेव्हीकॉल आणि फेव्हीक्वीक बनविणारी कंपनी पीडिलाईट इंडस्ट्रीजने गुंतवणूकदारांना तात्काळ रिटर्न्स दिले आहेत. कंपनीने आत्तापर्यंत 30 हजार टक्क्यांहून अधिक रिटर्न्स गुंतवणूकदारांना दिले. पिडिलाइट इंडस्ट्रीजच्या शेअर्संने गेल्या काही वर्षात गुंतवणूकदारांचा 55 लाख रुपयांहून अधिकचा फायदा केला आहे. म्हणजेच, कंपनीच्या शेअर्संमध्ये पैसे लावणारे लोक मालामाल झाले आहेत. पिडिलाइट इंडस्ट्रीजच्या शेअर्संच्या 52 आठवड्यांचा उच्चांक 2,764.60 रुपये एवढा आहे. 

पिडिलाइट इंडस्ट्रीजचे शेअर्स 27 मार्च 2009 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मध्ये 41.98 रुपये एवढे होते. आता, 24 मार्च 2022 को बीएसईमध्ये कंपनीच्या शेअर्संची किंमत तब्बल 2428.65 रुपयांवर ट्रेड करत आहे. जर एखाद्या व्यक्तीने 27 मार्च 2009 रोजी कंपनीच्या शेअर्संमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, आणि आपल्या गुंतवणूक कायम ठेवली असे, तर सद्यस्थितीत त्या 1 लाख रुपयांचे 57.83 लाख रुपये बनले आहेत. म्हणजेच कंपनीच्या शेअर्संमध्ये पैसे लावणाऱ्या व्यक्तीस थेट 56 लाख रुपयांहून अधिक फायदा झाला आहे. 

पिडिलाइट इंडस्ट्रीजच्या शेअर्संने आत्तापर्यंत गुंतवणूकदारांना जवळजवळ 30,700 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. कंपनीचे शेअर बीएसईमध्ये 22 मार्च 1996 रोजी 7.88 रुपये एवढे होते. कंपनीचे शेअर 24 मार्च 2022 को बीएसई में 2428.65 रुपयांवर व्यापार करत आहेत. जर, कोणी सुरूवातीलाच कंपनीच्या शेअर्संमध्ये 1 लाख रुपये गुंतवले आहेत, व ते कायम ठेवले आहेत. तर, सध्या ते पैसे 3 कोटी रुपयांहून अधिक आहेत. पिडिलाइट इंडस्ट्रीजच्या शेअर्सचा 52 आठवड्यांतील उच्चांक 2764.60 रुपये एवढा आहे. तर, कंपनीच्या गेल्या 52 आठवड्यांतील निच्चांक 1,755.60 रुपये एवढा आहे.  

टॅग्स :शेअर बाजारमुंबईपैसा