Join us
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिन यांनी केलं सर्वात मोठं सार्वजनिक दान; अदानी-अंबानींच्या एकत्रित नेटवर्थपेक्षाही अधिक आहे संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 13:47 IST

Sergey Brin News: जगातील अव्वल श्रीमंतांपैकी एक आणि गुगलचे सह-संस्थापक सर्गेई ब्रिन यांनी त्यांचं आतापर्यंतचे सर्वात मोठं सार्वजनिक दान दिलं आहे.

Sergey Brin News: जगातील अव्वल श्रीमंतांपैकी एक आणि गुगलचे सह-संस्थापक सर्गेई ब्रिन यांनी त्यांचं आतापर्यंतचे सर्वात मोठं सार्वजनिक दान दिलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी 'बिल्डिंग अ बेटर कॅलिफोर्निया'ला (Building a Better California) २० मिलियन डॉलर्स (सुमारे १८३.६१ कोटी रुपये) देणगी म्हणून दिले आहेत. कॅलिफोर्नियामधील स्वस्त घरांच्या समस्येवर उपाय शोधणं हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

टेक क्षेत्रातील दिग्गज एकत्र

ब्रिन यांच्या व्यतिरिक्त सिलिकॉन व्हॅलीतील इतर अनेक टेक नेत्यांनीही या मोहिमेला पाठबळ दिलंय. यात गुगलचे माजी सीईओ एरिक श्मिट, व्हेंचर कॅपिटलिस्ट मायकल मोरित्झ, पेपालचे सीईओ मॅक्स लेवचिन, स्ट्राइपचे पॅट्रिक कोलिसन, डोअरडॅशचे टॉनी शू आणि क्लायनर पर्किन्सचे जॉन डूर यांचा समावेश आहे. एकूण ३५ मिलियन डॉलर्सचा निधी जमा झाला असून, श्मिट आणि मोरित्झ यांनी प्रत्येकी २ दशलक्ष डॉलर्स, तर लेवचिन यांनी १ दशलक्ष डॉलर्स दिले आहेत. विशेष म्हणजे, कॅलिफोर्निया सरकार श्रीमंतांवर १ टक्के 'वेल्थ टॅक्स' लावण्याच्या तयारीत असताना ही देणगी देण्यात आली आहे.

बजेट २०२६ च्या घोषणेमुळे कॉफी २.५% पर्यंत महागणार; पाहा कोणकोणत्या वस्तूंसाठी खिसा करावा लागणार रिकामा

दानाचा विक्रम

सर्गेई ब्रिन यांनी गेल्या वर्षी दानाचे अनेक विक्रम प्रस्थापित केले. त्यांनी २०२१ मध्ये स्वतः स्थापन केलेल्या 'कॅटॅलिस्ट ४' (Catalyst4) या स्वयंसेवी संस्थेला सुमारे १ अब्ज डॉलर्सचे शेअर्स हस्तांतरित केले. याशिवाय त्यांनी 'मायकल जे फॉक्स फाउंडेशन'ला ४५ मिलियन डॉलर्स आणि आपल्या कौटुंबिक फाउंडेशनला ९० मिलियन डॉलर्स दिले होते. मे महिन्यात त्यांनी ७०० मिलियन डॉलर्सचं दान केलं होतं, ज्यामुळे गेल्या वर्षी ते सर्वाधिक दान करणाऱ्या व्यक्तींपैकी एक ठरले.

संपत्तीत मोठी वाढ आणि जागतिक स्थान

गेल्या वर्षी गुगलची मूळ कंपनी 'अल्फाबेट'च्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली, ज्यामध्ये ब्रिन यांची ६ टक्के भागीदारी आहे. त्यांच्या निव्वळ संपत्तीत (Net Worth) एका वर्षात ९७.३ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, २६९ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ते जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या पुढे इलॉन मस्क (६७६ अब्ज डॉलर्स) आणि लॅरी पेज (२८९ अब्ज डॉलर्स) आहेत. ब्रिन यांची एकूण संपत्ती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या एकत्रित संपत्तीपेक्षाही जास्त आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sergey Brin's Massive Donation Exceeds Combined Wealth of Adani & Ambani

Web Summary : Google co-founder Sergey Brin donated $20 million to 'Building a Better California,' addressing affordable housing. Other tech leaders joined, raising $35 million. Brin's past year saw significant donations, totaling over a billion. With Alphabet's stock surge, his net worth surpasses Adani and Ambani's combined.
टॅग्स :व्यवसायगुगलगौतम अदानीमुकेश अंबानी