Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 16:52 IST

Share Market Today : सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ४०० अंकांनी घसरल्याने बाजाराची सुरुवात कमकुवत झाली असली तरी, मजबूत जागतिक संकेतांमुळे आणि अमेरिकेसोबत व्यापार कराराच्या आशा वाढल्याने दुपारी बाजारात मोठी सुधारणा दिसून आली.

Share Market Today : भारतीय शेअर बाजारात आज, मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून आली. सकाळच्या सत्रात बाजारामध्ये मोठी अस्थिरता होती आणि सेन्सेक्स सुरुवातीच्या व्यवहारात ४०० अंशांपर्यंत घसरला होता. मात्र, दुपारनंतर मजबूत जागतिक संकेत आणि अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराच्या वाढलेल्या आशावादामुळे बाजारात जोरदार रिकव्हरी पाहायला मिळाली.

गुंतवणूकदारांनी कमावले ७४,००० कोटी रुपयेदिवसअखेर सेन्सेक्स ३३५.९७ अंकांनी (०.४० टक्के) वाढून ८३,८७१.३२ च्या स्तरावर बंद झाला. तर निफ्टी ५० सकाळच्या सत्रात २५,४५० च्या खाली घसरला होता, तो अखेरीस १३१.२५ अंकांनी (०.५१ टक्के) वाढून २५,७०५.६० च्या स्तरावर बंद झाला. या तेजीमुळे बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज ४६८.९४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. मागील दिवसाच्या तुलनेत यामध्ये सुमारे ७४,००० कोटींची वाढ झाली. म्हणजेच, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज सुमारे ७४ हजार कोटींनी वाढ झाली आहे.

ब्रॉडर मार्केटमध्ये संमिश्र कलबीएसई मिड कॅप इंडेक्स ०.२० टक्क्यांनी वाढला. तर बीएसई स्मॉल कॅप इंडेक्समध्ये मात्र ०.०९ टक्क्यांची किंचित घसरण दिसून आली.

या सेक्टरमध्ये जोरदार तेजीआजच्या व्यवहारात आयटी, टेलिकॉम, ऑटो आणि कॅपिटल गुड्स शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. याउलट, फायनान्शियल सर्व्हिसेस, फार्मा आणि रिॲल्टी शेअर्समध्ये मात्र काहीशी घसरण दिसून आली.

सर्वाधिक तेजी असलेले ५ शेअर्स (सेन्सेक्स)सेन्सेक्सच्या ३० पैकी २४ शेअर्स आज वाढीसह बंद झाले.

  1. भारत इलेक्ट्रॉनिक्स : २.५२%
  2. महिंद्रा अँड महिंद्रा : २.४०%
  3. अदाणी पोर्ट्स : २.३०%
  4. एचसीएल टेक : १.६५%
  5. इटरनल : १.५३%

सर्वाधिक घसरण झालेले ५ शेअर्स (सेन्सेक्स)

  1. बजाज फायनान्स : ७.३८%
  2. बजाज फिनसर्व : ६.२६%
  3. टाटा मोटर्स : १.३२%
  4. कोटक महिंद्रा बँक : ०.४०%
  5. पॉवरग्रिड : ०.२२%

आज बीएसईवर एकूण ४,३६३ शेअर्समध्ये व्यवहार झाला, त्यापैकी १,९५० शेअर्समध्ये तेजी तर २,२३४ शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली. तसेच, ११० शेअर्सनी आज आपला नवा ५२-आठवड्यांचा उच्चांक गाठला.

वाचा - सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Market Recovery: Mahindra, Adani soar; Tata, Bajaj shares decline.

Web Summary : Indian markets recovered after an initial dip, boosted by global cues. Mahindra and Adani shares surged, while Tata and Bajaj stocks faced losses. Investors gained ₹74,000 crore.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूकपैसानिर्देशांकनिफ्टी