Join us

सेन्सेक्स 38 हजारी; निफ्टीचीही ऐतिहासिक भरारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 10:40 IST

बहुसंख्य बँकांच्या शेअर्सचं मूल्य वधारल्यानं बाजारात तेजी

मुंबई: शेअर बाजारानं आज नवा उच्चांक गाठला आहे. सेन्सेक्सनं आज पहिल्यांदा 38 हजारांचा अंशांचा टप्पा ओलांडला. तर निफ्टीनंही 11,500 अशांचा टप्पा गाठला. सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी पहिल्यांदाच हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. बँकिंगसह जवळपास सर्वच कंपन्यांच्या शेअरच्या किमतीत चांगली वाढ झाली आहे. आज सकाळी शेअर बाजारात व्यवहारांना सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीनं नवा विक्रम गाठला. सेन्सेक्सनं इतिहासात पहिल्यांदाच 38 हजारांचा, तर निफ्टीनं साडे अकरा हजार अंशांचा टप्पा ओलांडला. आयसीआयसीआयच्या शेअरच्या किमतीत चांगली वाढ झाल्यानं शेअर बाजारात तेजी पाहायला मिळते आहे. याशिवाय एसबीआय, आयटीसी, ऍक्सिस बँकेच्या शेअर्सचे दरही वधारले आहेत. एचपीसीएल, बीपीसीएल, हिंदाल्को, वेदांता यांचीही कामगिरी चांगली झाली आहे. मात्र लुपिन, डॉ. रेड्डीज लॅब, टायटन, अशोक लेलँड, एनएमडीसीच्या शेअरचं मूल्य घसरलं आहे. 

टॅग्स :शेअर बाजारमुंबईआयसीआयसीआय बँकएसबीआय