Stock market : शुक्रवारचे सत्र भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत नाट्यमय ठरले. सकाळी उत्साहात सुरू झालेला बाजार दुपारी अमेरिकेतील युद्धाच्या बातम्यांमुळे अचानक दबावात आला. 'डाओ फ्युचर्स' ४०० अंकांनी कोसळल्याने भारतीय बाजारातही अखेरच्या तासात विक्रीचा मारा झाला. असे असूनही, आयटी आणि ऑटो शेअर्सच्या जोरावर सेन्सेक्स ३२६ अंकांच्या वाढीसह ७४,५३३ वर, तर निफ्टी ११२ अंकांच्या वाढीसह २३,११५ वर बंद झाला. मात्र, परकीय चलन बाजारात रुपयाने ९३.७६ चा ऐतिहासिक नीचांकी स्तर गाठल्याने चिंतेचे ढग गडद झाले आहेत.
शुक्रवारच्या सत्रातील 'हाय-व्होल्टेज' घडामोडी
- रुपयाचा विक्रमी नीचांक : व्यवहारादरम्यान रुपया प्रथमच ९३ च्या पार जात ९३.७६ पर्यंत कोसळला. बाजार बंद होताना तो ९२.७१ वर स्थिरावला असला, तरी ही आजवरची सर्वात कमकुवत 'क्लोजिंग' ठरली आहे.
- बँकिंग क्षेत्रावर दबाव : सकाळी तेजीत असलेले बँकिंग शेअर्स दुपारी अचानक कोसळले. निफ्टी बँक वरच्या स्तरावरून २% टुटला. यात एचडीएफसी बँकेने बाजाराला खाली खेचण्यात मोठी भूमिका बजावली.
- आयटी ठरला 'हिरो' : टेक महिंद्रा आणि एलटीआय माइंडट्री यांसारख्या शेअर्सनी जोरदार कामगिरी करत बाजाराला आधार दिला. तसेच, गुजरात सरकारसोबतच्या करारामुळे 'टाटा पॉवर'च्या शेअरमध्येही खरेदी दिसून आली.
चढ-उतार पण कल 'सपाट'
- गेल्या पाच दिवसांचा विचार करता, बाजारात दिशाहीनता दिसून आली. निर्देशांकात किरकोळ वाढ झाली असली तरी अनेक क्षेत्रांत विक्रीचा दबाव होता.
- अंडरपरफॉर्मर्स : बँकिंग क्षेत्रावर या आठवड्यात सर्वाधिक ताण होता. निफ्टी बँक १ टक्क्याने घसरली. निफ्टीमधील ५०% शेअर्सनी नकारात्मक परतावा दिला, ज्यात श्रीराम फायनान्स आणि HDFC बँक आघाडीवर होते.
- टॉप गेनर्स : गेल्या आठवड्यातील घसरणीनंतर ऑटो सेक्टरने मुसंडी मारली. मेटल आणि टेक शेअर्समध्येही चांगली खरेदी झाली. 'इटरनल', टाटा स्टील, एम अँड एम आणि जेएसडब्ल्यू स्टील हे या आठवड्याचे मानकरी ठरले.
- मिडकॅपमधील चमक: 'वारी', प्रीमियर एनर्जीज, पेटीएम आणि एंजेल वन यांसारख्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केले.
आठवडाभराची कामगिरी
| विभाग | कामगिरी (साप्ताहिक) | प्रमुख शेअर्स |
| टॉप गेनर्स | ऑटो, मेटल, आयटी | टाटा स्टील, टेक महिंद्रा, M&M |
| टॉप लूजर्स | बँकिंग, ऑईल & गॅस | HDFC बँक, BPCL, बंधन बँक |
| चलन | रुपया १.४% घसरला | आशियातील सर्वात कमकुवत चलन |
बाजार सध्या जागतिक युद्धाच्या बातम्या आणि रुपयाच्या घसरणीच्या कत्रीत अडकला आहे. आयटी आणि ऑटो शेअर्सनी जरी आधार दिला असला, तरी बँकिंग क्षेत्रातील कमजोरी ही काळजीची बाब आहे. जोपर्यंत बँकिंग इंडेक्स स्थिर होत नाही आणि रुपया सावरत नाही, तोपर्यंत बाजारात मोठी तेजी येणे कठीण आहे. अमेरिकन बाजारातील घसरणीचा परिणाम सोमवारी सकाळी भारतीय बाजारावर दिसू शकतो, त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध राहणे गरजेचे आहे.
वाचा - महागाईचा 'डबल डोस'! इंधनापाठोपाठ झोमॅटोची डिलिव्हरी महागली; प्लॅटफॉर्म फीमध्ये १९% वाढ
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Despite a volatile Friday session, Indian stocks closed higher, led by IT and auto sectors. The Sensex rose 326 points. However, a record low for the rupee against the dollar raises concerns about market stability. Banking sector weakness persists.
Web Summary : शुक्रवार को बाजार में उतार-चढ़ाव के बावजूद, आईटी और ऑटो शेयरों के कारण भारतीय बाजार में तेजी रही। सेंसेक्स 326 अंक ऊपर बंद हुआ। लेकिन, रुपये के रिकॉर्ड निचले स्तर पर पहुंचने से बाजार की स्थिरता पर चिंता बढ़ गई है। बैंकिंग क्षेत्र में कमजोरी बनी हुई है।