Join us

'या'पासून सावध राहा, SEBI चा गुंतवणूकदारांना इशारा; काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 16:53 IST

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने गुंतवणूकदारांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.

SEBI News : आर्थिक सेवा देणारे बेकायदेशीर प्लॅटफॉर्म आणि ॲप्सच्या वाढत्या संख्येबद्दल सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने गुंतवणूकदारांना इशारा दिला आहे. याद्वारे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून बचावासाठी 2024 मध्ये SEBI ने हा तिसरा इशारा दिला आहे. 

अलीकडील ॲडव्हायझरीमध्ये सेबीने म्हटले की, काही ॲप्स आणि वेब प्लॅटफॉर्म लिस्टेड कंपन्यांच्या शेअरच्या किंमतींवर आधारित व्हर्च्युअल ट्रेडिंग, पेपर ट्रेडिंग आणि फँटसी गेम्सचा प्रचार करत आहेत. सेबीने स्पष्ट केले आहे की, ही कृत्ये गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी आखलेल्या नियमांचे उल्लंघन करतात. सेबीने गुंतवणूकदारांना त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नोंदणीकृत स्थांमार्फतच गुंतवणूक किंवा व्यापार करण्याचे आवाहन केले आहे.

SEBI ने यापूर्वी ऑगस्ट 2016 मध्ये असाच सल्ला जारी केला होता, ज्यात सिक्युरिटीज मार्केटशी संबंधित स्पर्धा आणि बक्षीस रकमेच्या वितरणाचा समावेश असलेल्या योजनांबद्दल सावधगिरी बाळगली होती. सेबीने म्हटले आहे की, लोक केवळ नोंदणीकृत मध्यस्थांमार्फतच सिक्युरिटीज मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतात. बेकायदेशीर योजनांमध्ये सहभाग, गोपनीय आणि वैयक्तिक ट्रेडिंग डेटा शेअर करणे, गुंतवणूकदारांच्या स्वतःच्या जोखमीवर आहे.

टॅग्स :सेबीशेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक