Russia Selling Gold : एखाद्या व्यक्तीवर जेव्हा घरातील दागिने विकण्याची वेळ येते, तेव्हा समजायचे की आर्थिक संकट गडद झाले आहे. रशियाच्या बाबतीत सध्या नेमके हेच घडताना दिसत आहे. वाढता लष्करी खर्च आणि पाश्चात्य देशांचे निर्बंध यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेची कोंडी झाली असून, तब्बल २५ वर्षांनंतर रशियाने आपल्या तिजोरीतील प्रत्यक्ष सोन्याच्या विटा बाजारात विकण्यास सुरुवात केली आहे.
उत्पन्न घटले, खर्च वाढला!रशिया-युक्रेन युद्ध चौथ्या वर्षात पदार्पण करत असताना, रशियाचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. एकेकाळी रशियाच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेले तेल आणि गॅसचे उत्पन्न आता निम्म्याहून कमी होऊन केवळ २० टक्क्यांवर आले आहे. २०२५ मध्ये रशियाची वित्तीय तूट जीडीपीच्या २.६ टक्क्यांवर पोहोचली आहे, जी सुरुवातीला केवळ ०.५ टक्के अपेक्षित होती. युद्धाचा खर्च प्रचंड वाढल्याने रोख रकमेची कमतरता भासू लागली आहे.
सोन्याच्या विक्रीचा धडाका२०२६ च्या सुरुवातीच्या दोन महिन्यांतच रशियाने सोन्याची मोठी विक्री केली आहे.
- जानेवारी २०२६ : ३ लाख औंस सोने विकले.
- फेब्रुवारी २०२६ : २ लाख औंस सोने विकले.
- एकूण विक्री : अवघ्या दोन महिन्यांत सुमारे १४ टन सोने बाजारात उतरवण्यात आले आहे. यापूर्वी सोन्याचे व्यवहार केवळ कागदोपत्री व्हायचे, मात्र आता प्रत्यक्ष सोने बाहेर काढले जात आहे.
मजबुरी की संधी?रशियासाठी ही केवळ मजबुरी नाही, तर एक रणनीती देखील आहे. सध्या जागतिक बाजारात सोन्याचा भाव ५,००० डॉलर प्रति औंसच्या पार गेला आहे. वाढलेल्या भावामुळे रशियाच्या एकूण सोन्याच्या साठ्याचे मूल्य ८०० अब्ज डॉलरपेक्षा जास्त झाले आहे. म्हणजेच, चढ्या भावात सोने विकून रशिया जास्तीत जास्त रोख रक्कम उभी करत आहे.
वाचा - टाटांना सर्वाधिक नफा देणाऱ्या रेंज रोव्हरचे उत्पादन थांबले! शेअर ५ टक्क्यांनी कोसळला
जगाची चिंता का वाढली?
- रशिया अजूनही जगातील पाचवा सर्वात मोठा 'गोल्ड होल्डर' आहे (२००० टनांहून अधिक साठा). तरीही चिंता यासाठी आहे की,
- सेफ्टी कुशन : जर रशिया सातत्याने आपले 'सेफ्टी रिझर्व्ह' विकू लागला, तर त्यांचा आर्थिक पाया कमकुवत होईल.
- जागतिक बाजार : रशियाने मोठ्या प्रमाणात सोन्याचा पुरवठा बाजारात केल्यास सोन्याच्या जागतिक किमतींवर परिणाम होऊ शकतो.
- युद्ध लांबणीवर : सोने विकून पैसा उभा केल्याने युद्ध अधिक काळ खेचले जाण्याची शक्यता आहे.
Web Summary : Facing economic strain from war costs and sanctions, Russia sells gold reserves after 25 years. Increased supply may impact global prices, raising concerns about prolonged conflict.
Web Summary : युद्ध और प्रतिबंधों से आर्थिक तनाव के कारण, रूस ने 25 वर्षों बाद सोने के भंडार बेचे। आपूर्ति बढ़ने से वैश्विक कीमतों पर असर पड़ सकता है, जिससे लंबे समय तक संघर्ष की चिंता बढ़ गई है।