Join us
Daily Top 2Weekly Top 5

डीमॅट अकाऊंटशी निगडीत नियम झाले सोपे; पाहा गुंतवणूकदारांना काय होणार फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 11:46 IST

Demat Account Rules: बाजार नियामक 'सेबी'नं (SEBI) डिमॅट खात्यात सिक्युरिटीज (शेअर्स) जमा करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे. याचा गुंतवणूकदारांना फायदा होणारे.

Demat Account Rules: बाजार नियामक 'सेबी'नं (SEBI) डिमॅट खात्यात सिक्युरिटीज (शेअर्स) जमा करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे. या महत्त्वपूर्ण बदलामुळे आता गुंतवणूकदारांना 'लेटर ऑफ कन्फर्मेशन'ची (LoC) गरज भासणार नाही, सेबीनं ही अट आता रद्द केली आहे. या निर्णयामुळे सिक्युरिटीज ट्रान्सफर करण्यासाठी लागणारा १५० दिवसांचा कालावधी आता केवळ ३० दिवसांवर येणार आहे.

सेबीकडून नवीन नियमांचं परिपत्रक

भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सेबी) नं शुक्रवारी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलंय की, सध्या शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्या, इश्यू रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट गुंतवणूकदारांना एलओसी जारी करतात. हे पत्र सिक्युरिटीज जमा करण्यासाठी डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे सादर करावं लागतं.

'रिस्क है तो इश्क है..,' एफडी नाही तर आता शेअर बाजारात अधिक गुंतवणूक करताहेत भारतीय; काय म्हणतो रिपोर्ट

आता थेट डिमॅट खात्यात जमा होणार सिक्युरिटीज

या जुन्या प्रक्रियेत साधारणपणे १५० दिवस लागत असत. गुंतवणूकदारांची गैरसोय टाळण्यासाठी आणि वेळ व जोखीम कमी करण्यासाठी सेबीनं एलओसी (LoC) जारी करण्याची गरज संपवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन व्यवस्थेनुसार, आरटीए (RTA) आणि लिस्टेड कंपन्या योग्य तपासणी केल्यानंतर गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात थेट सिक्युरिटीज जमा करतील. या बदलामुळे वेळ वाचण्यासोबतच पत्राच्या चोरीचा किंवा गैरवापराचा धोकाही संपुष्टात येईल.

२ एप्रिल पासून नवीन नियम

सेबीनं स्पष्ट केलंय की, डिमॅट खात्यात सिक्युरिटीज जमा करण्याचा हा नवीन नियम २ एप्रिल २०२६ पासून लागू होईल. या तारखेपूर्वी जारी केलेली कोणतीही एलओसी विहित मुदतीत वापरता येईल. बाजारातील गुंतवणूक सुलभ करणं, कार्यक्षमता वाढवणं आणि गुंतवणूकदारांचं संरक्षण अधिक मजबूत करणं हा या पुढाकाराचा मुख्य उद्देश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Demat account rules simplified; benefits for investors explained.

Web Summary : SEBI simplifies demat account security transfers, eliminating the need for 'Letter of Confirmation.' Transfer time reduces from 150 to 30 days. New rules, effective April 2, 2026, aim to ease investment and protect investors from fraud.
टॅग्स :सेबीसरकारपैसा