Rolls-Royce CEO Meets PM Modi: ब्रिटनची लक्झरी कार निर्माता कंपनी रोल्स-रॉयसचे सीईओ तुफान एर्गिनबिलजिक यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी भारतात आपला व्यवसाय वाढवण्याबाबत आणि 'विकसित भारत' अभियानाचा भाग होण्याबाबत सविस्तर चर्चा केली. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला. रोल्स-रॉयसचा भारतातील वाढता रस आणि येथील तरुण व नाविन्यपूर्ण कार्यबलासोबत भागीदारी करण्याच्या त्यांच्या निर्णयाचं भारत स्वागत करत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
भारतात जगातील सर्वात मोठे केंद्र उभारण्याची योजना
रोल्स-रॉयसनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, या बैठकीत भारतातील कंपनीचे अस्तित्व अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. यामध्ये कंपनीच्या 'ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर'चा (GCC) विस्तार करून ते जगातील सर्वात मोठं केंद्र बनवण्याची योजना समाविष्ट आहे. या चर्चेदरम्यान भारतातील कॉम्प्लेक्स मॅन्युफॅक्चरिंग आणि उच्च मूल्य असलेल्या अभियांत्रिकी क्षमतांच्या विकासावरही संवाद झाला. हा विस्तार कंपनीच्या दीर्घकालीन धोरणाचा भाग असून, याद्वारे भारताच्या वेगाने वाढणाऱ्या औद्योगिक आणि अभियांत्रिकी इकोसिस्टमशी संबंध अधिक दृढ करण्याचा कंपनीचा मानस आहे.
बाजार उघडताच चांदीत ₹२,५०० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; काय आहेत Gold-Silver चे नवे दर
आत्मनिर्भर भारत आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्य
सीईओ तुफान एर्गिनबिलजिक आणि कंपनीचे भारत प्रमुख साशी मुकुंदन यांनी पंतप्रधानांशी चर्चा करताना रोल्स-रॉयसचे प्रगत तंत्रज्ञान 'आत्मनिर्भर भारत' प्रवासात संरक्षण आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांना कशी मदत करू शकते, यावर प्रकाश टाकला. याच दिशेनं पाऊल टाकत कंपनीनं अलीकडेच बंगळुरूमध्ये आपल्या विस्तारित 'ग्लोबल कॅपेबिलिटी आणि इनोव्हेशन सेंटर'चं उद्घाटन केलं आहे. हे केंद्र नागरी एरोस्पेस, संरक्षण आणि पॉवर सिस्टम्स यांसारख्या प्रमुख क्षेत्रांना बळ देईल आणि जगातील कंपनीचं सर्वात मोठं क्षमता असलेलं हब बनण्याच्या मार्गावर आहे.
Web Summary : Rolls-Royce CEO met PM Modi, discussing expanding Indian operations and supporting 'Developed India'. The company plans to make its India Global Capability Center the world's largest, focusing on complex manufacturing and high-value engineering, strengthening ties with India's industrial ecosystem and supporting 'Atmanirbhar Bharat'.
Web Summary : रोल्स-रॉयस के सीईओ ने पीएम मोदी से मुलाकात की, जिसमें भारतीय परिचालन का विस्तार करने और 'विकसित भारत' का समर्थन करने पर चर्चा हुई। कंपनी भारत में अपने ग्लोबल कैपेबिलिटी सेंटर को दुनिया का सबसे बड़ा केंद्र बनाने की योजना बना रही है, जो जटिल विनिर्माण और उच्च मूल्य इंजीनियरिंग पर ध्यान केंद्रित करेगा, भारत के औद्योगिक पारिस्थितिकी तंत्र के साथ संबंधों को मजबूत करेगा और 'आत्मनिर्भर भारत' का समर्थन करेगा।