Union Budget
Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > जनतेला दिलासा, पण तिजोरीला ‘धक्का’; योजनांना मोठा फटका, बजेटचे गणित बिघडणार?

जनतेला दिलासा, पण तिजोरीला ‘धक्का’; योजनांना मोठा फटका, बजेटचे गणित बिघडणार?

सरकारी तिजोरीतून १.१५ लाख कोटी रुपये कमी होणार आहेत. देशाची वित्तीय तूट ०.३ टक्क्यांनी वाढू शकते. ही तूट एकूण बजेटच्या २.२ टक्के इतकी मोठी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 09:56 IST2026-03-28T09:54:06+5:302026-03-28T09:56:31+5:30

सरकारी तिजोरीतून १.१५ लाख कोटी रुपये कमी होणार आहेत. देशाची वित्तीय तूट ०.३ टक्क्यांनी वाढू शकते. ही तूट एकूण बजेटच्या २.२ टक्के इतकी मोठी आहे.

relief for the people, but big shock to the treasury hit to the some govt schemes will the budget calculations be ruined | जनतेला दिलासा, पण तिजोरीला ‘धक्का’; योजनांना मोठा फटका, बजेटचे गणित बिघडणार?

जनतेला दिलासा, पण तिजोरीला ‘धक्का’; योजनांना मोठा फटका, बजेटचे गणित बिघडणार?

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी एक्साईज ड्युटीमध्ये (उत्पादन शुल्क) कपात केली असली, तरी यामुळे सरकारी तिजोरीतून १.१५ लाख कोटी रुपये कमी होणार आहेत. या तुटीमुळे आगामी काळात पायाभूत सुविधा आणि महत्त्वाकांक्षी कल्याणकारी योजनांच्या बजेटला मोठी कात्री लागण्याचे संकेत आहेत. जर सरकारने हा तोटा भरून काढण्यासाठी पावले उचलली नाहीत, तर देशाची वित्तीय तूट अंदाजित लक्ष्यापेक्षा ०.३ टक्क्यांनी वाढू शकते. ही तूट एकूण बजेटच्या २.२ टक्के इतकी मोठी आहे.

या योजनांना मोठा फटका

पीएम आवास योजना : योजनेचा खर्च बजेटपेक्षा कमी झाला आहे. आता यात अधिक कपात होऊ शकते.

जलजीवन मिशन : या मिशनसाठी ६७,००० कोटींची तरतूद होती, मात्र खर्च कमी झाला.

रेल्वे आणि रस्ते विकास : नवीन प्रकल्पांची गती मंदावण्याची शक्यता आहे.

बजेटचे गणित बिघडणार? 

१.१५ लाख कोटींची ही रक्कम देशाच्या संपूर्ण शिक्षण बजेटच्या (१.४ लाख कोटी) जवळपास आहे. 

पीएम-किसान योजनेसाठी दिल्या जाणाऱ्या निधीच्या (६३,५०० कोटी) ही दुप्पट रक्कम आहे.

रेल्वेच्या विकासकामांसाठी ठेवलेल्या निधीच्या ४० टक्के किंवा संरक्षणाच्या भांडवली खर्चाच्या ५० टक्के ही रक्कम आहे.

अनुदानाचे मोठे आव्हान

महसूल घटत असताना, दुसरीकडे खत अनुदानाचा बोजा १.७ लाख कोटींवर गेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात किमती वाढल्यास हा आकडा आणखी वाढू शकतो. 

Web Title : उत्पाद शुल्क में कटौती से राहत, पर खजाने को झटका; बजट गणित बिगड़ा?

Web Summary : उत्पाद शुल्क में कटौती से राहत मिली, लेकिन खजाने को ₹1.15 लाख करोड़ का नुकसान हुआ। बुनियादी ढांचे और कल्याणकारी योजनाओं के बजट में कटौती की आशंका है। वित्तीय घाटा 0.3% तक बढ़ सकता है, जिससे शिक्षा, किसान योजनाएं, रेलवे और रक्षा निधि प्रभावित हो सकती हैं। उर्वरक सब्सिडी में वृद्धि से और चुनौतियां बढ़ेंगी।

Web Title : Excise Cut Relief, but Treasury Hit; Budget Math Disturbed?

Web Summary : Excise duty cuts offer relief but drain the treasury by ₹1.15 lakh crore. Infrastructure and welfare schemes face budget cuts. Fiscal deficit may rise by 0.3%, impacting education, farmer schemes, railways, and defense funding. Rising fertilizer subsidies pose further challenges.