Join us  

Reliance Jio ची जबरदस्त ऑफर; स्वस्त रिचार्च प्लॅन्सवर मिळतोय २० टक्क्यांचा कॅशबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 6:36 PM

Reliance Jio Prepaid Plan Cashback : पाहा कोणते आहेत जिओचे प्लॅन्स.

ठळक मुद्देपाहा कोणते आहेत जिओचे प्लॅन्स.

रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक विशेष ऑफर आणली आहे. ऑफर अंतर्गत प्रीपेड रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना 20 टक्के कॅशबॅक दिला जात आहे. हा कॅशबॅक कंपनीच्या तीन रिचार्ज प्लॅनवर उपलब्ध असेल. 249 रुपये, 555 रुपये आणि 599 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर हा कॅशबॅक दिला जात आहे. Jio नं वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार जास्तीत जास्त 200 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. हा कॅशबॅक 2 ऑक्टोबर नंतर रिडीम केला जाऊ शकतो. पाहूया काय आहेत हे रिचार्ज प्लॅन्स.

249 रुपयांचा जिओचा प्लॅनया प्लॅनवर ग्राहकांना 20 टक्क्यांचा कॅशबॅक मिळेल. दररोज 2 जीबी डेटासह येणारा कंपनीचा हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. 249 रुपयांच्या प्लानमध्ये दररोज 2 जीबी डेटासह 28 दिवसांची वैधता दिली जाते. म्हणजेच, ग्राहक एकूण 56 जीबी डेटा वापरू शकतील. याशिवाय सर्व नेटवर्कवर मोफत कॉल करण्याची आणि दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधादेखील दिली जाते. याशिवाय, जिओ अॅप्सचे (JioTV, JioCinema, JioSecurity, JioNews आणि JioCloud) मोफत सबस्क्रिप्शनही दिलं जातं.

555 रूपयांचा प्लॅनहा रिलायन्स जिओचा दुसरा प्लॅन आहे ज्यासोबत ग्राहकांना 20 टक्के कॅशबॅक देण्यात येतो. 555 रुपयांचा Jio प्लान 84 दिवसांसाठी आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा दिला जातो. अशा प्रकारे एकूण डेटा 126 जीबी होतो. रिलायन्स जिओच्या या प्लानमध्ये मोफत कॉलिंगसह दररोज 100 एसएमएसही मोफत दिले जातात. याशिवाय, Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन (JioTV, JioCinema, JioSecurity, JioNews आणि JioCloud) प्लॅनमध्ये उपलब्ध आहे.

599 रूपयांचा प्लॅनहा प्लॅनदेखील दररोज 2 जीबी डेटासह येतो. ग्राहकांना 599 रुपयांमध्ये 84 दिवसांची वैधता दिली जाते. अशा प्रकारे एकूण डेटा 168 जीबी होतो. याशिवाय ग्राहकांना सर्व नेटवर्कवर मोफत कॉल करण्याची आणि दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा देखील दिली जाते. याशिवाय, जिओ अॅप्सचे (JioTV, JioCinema, JioSecurity, JioNews आणि JioCloud) मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

टॅग्स :रिलायन्स जिओस्मार्टफोनइंटरनेटपैसा