Join us  

फ्री नेटफ्लिक्स मेम्बरशिप असलेले JioFiber प्लॅन्स; १ जीबीपर्यंत मिळणार स्पीड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 4:08 PM

Reliance Jio Fiber Plans Netflix : सध्या अनेक ठिकाणी सुरू करण्यात आली आहे रिलायन्स जिओ (Reliance JioFiber) सेवा.

ठळक मुद्देध्या अनेक ठिकाणी सुरू करण्यात आली आहे रिलायन्स जिओ (Reliance JioFiber) सेवा.

रिलायन्स जियोफाइबर (Reliance JioFiber) ब्रॉडबँड सर्विस प्रीपेड और पोस्टपेड या दोन्ही प्रकारांमध्ये येतो. यामध्ये काही प्लॅन्स असेही आहेत ज्यात अनेक आकर्षक बेनिफिट्स मिळतात. यापैकी एक प्लॅन आहे तो म्हणजे Netflix सबस्क्रीप्शन मिळणारा. नेटफ्लिक्सभारतच नाही तर जगभरातील सर्वात लोकप्रिय असलेला ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. जर तुम्हाला नेटफ्लिक्सचं मेंबरशिप हवं असेल तर तुम्ही Reliance JioFiber च्या प्लॅनसहदेखील घेऊ शकता.  

सुरुवातीच्या मासिक प्लॅनबद्दल सांगायचं झालं तर तो 1.499 रूपयांचा आहे. त्यामध्ये नेटफ्लिक्सची मेंबरशीप मिळते. याशिवाय त्यात प्राईम व्हिडीओ, डिज्नी + हॉटस्टार, झी ५ अशा अनेक सेवांची मेंबरशीप दिली जाते. यामध्ये 300mbps स्पीडसोबत अनलिमिटेड डेटा देण्यात येतो. तसंच यात याशिवाय 2499 रूपये, 3999 रूपये आणि 8499 रूपये प्रति महिना असेही प्लॅन्स येतात. 

याशिवाय कंपनी 90 दिवसांचाही एक प्लॅन देते. यामध्ये 4497 रूपये, 7497 रूपये, 11997 रूपये आणि 25497 रूपयांचे प्लॅनही येतात. यामध्येही नेटफ्लिक्सचे प्लॅन देण्यात येतात. याशिवाय कंपनी सेमी अॅन्युअल प्लॅनही ऑफर करते. नेटफ्लिक्ससह येणाऱ्या प्लॅनची किंमत 8994 रूपये, 14994 रूपये, 23994 रूपये आणि 50994 रूपये इतकी आहे. 

कोणते आहेत पोस्टपेड प्लॅन्स?JioFiber पोस्टपेड प्लॅन्स अॅन्युअल आणि सेमी अॅन्युअल प्लॅनसह येतात. सेमी अॅन्युअल पोस्टपेड प्लॅनची किंमत 8994 रूपये, 14994 रूपये, 23994 रूपये आणि 50994 रूपयांमध्ये येतात. तर वार्षिक प्लॅनची किंमत 17988 रूपये, 29988 रूपये आणि 47988 रूपये, 1,01988 रूपये आहे.

टॅग्स :नेटफ्लिक्सरिलायन्स जिओभारतइंटरनेट