Join us

महिन्याला ७० रूपयांपेक्षा कमी खर्च; Reliance Jio च्या या प्लॅनमध्ये मिळतोय डेटा, अनलिमिटेड कॉलिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 18:30 IST

Reliance Jio : पाहा काय आहे या प्लॅनमध्ये खास

ठळक मुद्देसध्या अनेक कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवे प्लॅन लाँच केले जात आहेत.

रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियासारख्या दूरसंचार कंपन्या सतत नवीन ग्राहक जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर दुसरीकडे ग्राहक आपल्याकडे आकर्षित व्हावा यासाठी कंपन्या सातत्यानं काही नवनवे प्लॅन्स बाजारात आहेत. दूरसंचार कंपन्यांमध्ये स्पर्धा सातत्यानं वाढत आहे आणि त्याचा थेट ग्राहकांना फायदा झाला आहे. पूर्वीच्या तुलनेत आता रिचार्ज प्लॅनसोबत ग्राहकांना आता विनामूल्य कॉलिंग, डेटा आणि अधिक लाभ मिळू लागले आहेत. पाहूया रिलायन्स जिओचा असा प्लॅन ज्याचा महिन्याला खर्च ७० रूपयांपेक्षाही कमी आहे. तसंच त्यासोबत डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचाही लाभ मिळतो. रिलायन्स जिओचा हा प्लॅन ७४९ रूपयांचा आहे. या प्लॅमध्ये रिलायन्स जिओच्या विद्यमान ग्राहकांना ७४९ रूपयांमध्ये १२ महिन्यांसाठी अनलिमिटेड सेवांचा लाभ घेता येऊ शकतो. याप्रकारे एका महिन्याचा खर्च पाहिला तर तो जवळपास ६८ रूपये इतका येतो. परंतु सध्या हा प्लॅन  केवळ Jio Phone युझर्ससाठीच आहे. 

या प्लॅनमध्ये ग्राहकांना दर महिन्याला २ जीबी हायस्पीड इंटरनेटचा वापर करता येणार आहे. तसंच याशिवाय ७४९ रूपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना १ वर्षापर्यंत अनलिमिटेड कॉलिंगचाही लाभ घेता येणार आहे. तर ग्राहकांना ५० एसएमएसही देण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त या प्लॅनसोबत ग्राहकांना जिओ अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही देण्यात येतं. 

टॅग्स :रिलायन्स जिओइंटरनेटएअरटेलव्होडाफोनआयडिया