Join us

3 लाख कोटींची गुंतवणूक, 3 लाख नोकऱ्या; रिलायन्सचा महाराष्ट्रावर विश्वास, दावोसमध्ये मोठा करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 15:29 IST

रिलायन्स इंडस्ट्रीज आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात दावोसमध्ये हा मोठा करार झाला आहे.

Reliance Investment in Maharashtra : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industry) महाराष्ट्रात 3.05 लाख कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करणार आहे. दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2025 मध्ये रिलायन्सचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी (Anant Ambani) आणि महाराष्ट्र सरकारमध्ये या मोठ्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या कराराची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. 

दावोसमध्ये सामंजस्य कराररिलायन्स इंडस्ट्रीजकडून महाराष्ट्रात न्यू एनर्जी आणि रिटेलसह इतर क्षेत्रात 3.05 लाख कोटी रुपयांची ही गुंतवणूक केली जाणार आहे. राज्याच्या विकासाला चालना देणारी ही ऐतिहासिक गुंतवणूक असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे. सीएमओच्या वतीने सांगण्यात आले की, महाराष्ट्रासाठी हा खूप महत्त्वाचा क्षण आहे. अनंत अंबानी यांच्या नेतृत्वाखाली GoM आणि RIL यांनी दावोसमध्ये या मोठ्या करारावर स्वाक्षरी केली आहे.

3 लाख नोकऱ्या निर्माण होतीलमुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, या गुंतवणुकीच्या माध्यमातून न्यू एनर्जी, रिटेल, हॉस्पिटॅलिटीसह उत्पादन क्षेत्रात 3,00,000 हून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील. या कराराबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, रिलायन्सची ही गुंतवणूक पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, बायो-एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, ग्रीन केमिकल, औद्योगिक क्षेत्रातील वाढ, डेटा सेंटर, टेलिकॉम आणि रिअल इस्टेट यासह इतर अनेक क्षेत्रात केली जाईल.

अनंत अंबानी काय म्हणाले?या कराराबद्दल बोलताना अनंत अंबानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र सरकारचे आभार मानले. हा माझ्यासाठी आणि रिलायन्ससाठी खूप अभिमानाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली रिलायन्स 'न्यू इंडिया'च्या कल्पनेसाठी नेहमीच कटिबद्ध आहे, अशी प्रतिक्रिया अनंत अंबानी यांनी दिली.

टॅग्स :रिलायन्समहाराष्ट्रगुंतवणूकअनंत अंबानीमुकेश अंबानीदेवेंद्र फडणवीस