Join us  

कौतुकास्पद! मुकेश अंबानी ठरले जगातील सहावे श्रीमंत व्यक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 4:29 PM

मुकेश अंबानी हे संपूर्ण आशिया खंडातील या श्रीमंतांच्या यादीत असलेले पहिल्या 10 क्रमांकामधील एकमेव व्यक्ती आहेत.

नवी दिल्लीः रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक (Reliance Industries Chairman, Mukesh Ambani)  मुकेश अंबानी हे जगातील सहावे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. गुगलच्या सह-संस्थापक लॅरी पेजला(Google Co-Founder Larry Page) मागे टाकत त्यांनी हे स्थान मिळवले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार(Bloomberg Billionaire Index), मुकेश अंबानी यांची एकूण मालमत्ता 72.4 अब्ज डॉलर्स आहे. यापूर्वी मुकेश अंबानी यांनी या यादीत 8 व्या क्रमांकावर असलेल्या जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार वारेन बफे यांची जागा घेतली आहे. मुकेश अंबानी हे संपूर्ण आशिया खंडातील या श्रीमंतांच्या यादीत असलेले पहिल्या 10 क्रमांकामधील एकमेव व्यक्ती आहेत.मालमत्ता कशी वाढली? रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अध्यक्षांच्या संपत्तीत वाढ होण्यामागील कारण म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (आरआयएल शेअर्स प्राइस) समभागांमध्ये सतत वाढ होणे. मार्चपासून RILचे शेअर्स दुपटीने वाढले आहेत. वास्तविक, नुकतीच रिलायन्सची तंत्रज्ञान शाखा जिओ प्लॅटफॉर्मने फेसबुकसह अनेक जागतिक कंपन्यांशी करार करण्याची घोषणा केली आहे. तेव्हापासून RILच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. तीन महिन्यांत 12 परदेशी कंपन्यांनी रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक केली आहे. फेसबुक, सिल्व्हर लेक पार्टनर्स, व्हिस्टा, जनरल अटलांटिक, केकेआर, मुबाडाला, सिल्व्हर लेक, एडीआयए, टीपीजी, एल कॅटरटन, पीआयएफ यांनी जिओमध्ये गुंतवणूक केली आहे. रिलायन्सने जिओ प्लॅटफॉर्मच्या भागभांडवलातून 117,588.45 कोटी रुपये जमा केले आहेत. RILला आतापर्यंत जिओ प्लॅटफॉर्ममधील 25.09 टक्के भागीदारीसाठी गुंतवणूक मिळाली आहे.या यादीमध्ये ऍमेझॉनचे जेफ बेझोस पहिल्या क्रमांकावर आहेत. त्याची एकूण संपत्ती 184 अब्ज डॉलर्स आहे. त्यापाठोपाठ बिल गेट्स ( संपत्ती - 115 अब्ज डॉलर्स), बर्नार्ड अर्नाल्ट (संपत्ती - 94.5अब्ज डॉलर्स), मार्क झुकरबर्ग (संपत्ती- 90.8 अब्ज डॉलर्स), स्टेल बाल्मर (संपत्ती - 74.6 अब्ज डॉलर्स) आणि मुकेश अंबानी (संपत्ती- 72.4 अब्ज डॉलर्स) यांचा समावेश आहे. 

हेही वाचा

बोगस रेशन कार्डवर आता मिळणार नाही तांदूळ अन् गहू; 'अशा' पद्धतीनं वगळलं जाणार नाव

NCLनं १०वी पास असलेल्यांसाठी काढली मोठी नोकरभरती; असा करा अर्ज...

20 लाख रुपये किलोनं विकला जातो भारतातील 'हा' किडा, पण चीननं सगळा 'राडा' केला!

अमेरिकेच्या प्रभावात असलेल्या भारताला इराणचा झटका; 'या' मोठ्या परियोजनेतून केलं बाहेर

यशस्वी गुंतवणूकदार व्हायचंय? तर या ५ सवयींचं नक्की पालन करा!

चीनविरोधात जगभरात रोष; भारतासाठी हीच सुवर्णसंधी- नितीन गडकरी

लेहपासून 250 किमी अंतरावर चीनकडून भूमिगत 24 क्षेपणास्त्रे तैनात; भारताची चिंता वाढवणारा खुलासा

चीनमध्ये नव्या संकटानं पसरली भीती; 3.8 कोटी लोक प्रभावित, 140 जणांचा मृत्यू

CoronaVirus News : जागतिक स्तरावर परिस्थिती भयंकर; यूरोप अन् आशियातील बरेच देश चुकीच्या मार्गावर- WHO

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्सरिलायन्स जिओजिओ