Join us

Reliance नं 'ऑपरेशन सिंदूर' नावाचा ट्रेडमार्क आपल्या नावे करण्यासाठी केला अर्ज, प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 14:21 IST

Operation Sindoor Trademark: मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं (RIL) 'ऑपरेशन सिंदूर' नावाचा ट्रेडमार्क आपल्या नावे करण्यसाठी अर्ज केला आहे. हे नाव पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या भारताच्या लष्करी कारवाईचं कोडनेम आहे.

Operation Sindoor Trademark: मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं (RIL) 'ऑपरेशन सिंदूर' नावाचा ट्रेडमार्क आपल्या नावे करण्यसाठी अर्ज केला आहे. हे नाव पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या भारताच्या लष्करी कारवाईचं कोडनेम आहे. ट्रेड मार्कसह चित्रपट, शो, कॉन्सर्ट, गेम्स किंवा ऑडिओ-व्हिडिओ कंटेंट तयार करणं, प्रकाशन सेवांमध्ये याचा वापर करण्याची परवानगी असेल.

लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, रिलायन्सनं हा ट्रेडमार्क ७ मे रोजी "क्लास ४१" अंतर्गत अप्लाय केला, ज्या दिवशी ही लष्करी कारवाई झाली. वाणिज्य मंत्रालयाच्या ट्रेडमार्क सर्च पोर्टलनुसार, हे नाव मनोरंजनासाठी वापरण्याचा कंपनीचा मानस आहे. दरम्यान, रिलायन्सनं यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. कंपनीचा मिडिया आणि एन्टरटेन्मेंट विभग पहिल्यापासूनच न्यूज, स्पोर्ट्स आणि चित्रपटांची निर्मिती करतो.

₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला

ट्रेडमार्क कसा मिळेल??

हे नाव यापूर्वी कोणी घेतलंय की नाही याची पडताळणी ट्रेडमार्क रजिस्ट्रीद्वारे केली जाईल. जर कोणतीही हरकत आली नाही, तर सरकारच्या ट्रेडमार्क जनरलमध्ये हे छापलं जाईल. यानंतर ४ महिन्यांपर्यंत कोणत्याही व्यक्तीला हरकत असल्यास ती नोंदवता येईल. सर्वकाही ठीक असेल तर ट्रेडमार्क रिलायन्सच्या नावे केला जाईल. 

आणखी कोणी केला अर्ज?

रिलायन्सव्यतिरिक्त मुंबईचे मुकेश चेतराम अग्रवाल, जम्मूचे ग्रुप कॅप्टन कमल सिंग (निवृत्त) आणि दिल्लीचे आलोक कोठारी यांनीही याच नावासाठी अर्ज केले आहेत.

टॅग्स :रिलायन्सऑपरेशन सिंदूर