Reliance Mukesh Ambani On Gold Silver: गेल्या काही दिवसांतील घसरणीनंतर सोने आणि चांदीचे दर पुन्हा एकदा गगनाला भिडले आहेत. यामुळे लोक पारंपरिक सुरक्षित गुंतवणुकीकडे आकर्षित होत असले तरी, रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचं मत वेगळं आहे. भारत सारख्या वेगानं वाढणाऱ्या देशात केवळ सोने-चांदीत पैसे गुंतवणं हा संपत्ती वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग नाही, असं त्यांनी म्हटलंय.
सोन्या-चांदीच्या आयातीवर अंबानींचे भाष्य
नुकत्याच झालेल्या एका 'जिओब्लॅकरॉक' (JioBlackRock) कार्यक्रमात बोलताना अंबानी यांनी माहिती दिली की, गेल्या वर्षी भारतानं सुमारे ६० अब्ज डॉलरचं सोनं आणि १०-१५ अब्ज डॉलरच्या चांदीची आयात केली. ते म्हणाले की, यातील बहुतांश पैसा अशा गोष्टींमध्ये अडकला आहे ज्यांचा थेट उत्पादनात वापर होत नाही; लोक हे फक्त बचत म्हणून स्वतःकडे ठेवतात. त्यांच्या मते, सोने-चांदी कठीण काळात सुरक्षा नक्कीच देतात, पण देशाच्या आर्थिक प्रगतीत त्यांचं थेट योगदान नसतं.
सोन्या-चांदीबाबतची बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली का? आर्थिक संकटानं जग हादरलं
शेअर बाजारात गुंतवणुकीचे आवाहन"जर आपण भारतीय बचतकर्त्यांना शेअर बाजारासारख्या भांडवली बाजारात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करू शकलो, तर हा पैसा काळाबरोबर अधिक वाढेल. लोकांनी आपली बचत अशा ठिकाणी गुंतवावी जी फक्त पडून राहणार नाही, तर व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेसोबत त्यात वाढ होईल," असं त्यांनी स्पष्ट केलं.उत्पादक गुंतवणुकीचे महत्त्व
सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे भारतीयांची या मौल्यवान धातूंना संपत्ती मानण्याची जुनी सवय पुन्हा दृढ झाली आहे. मात्र, अंबानींचा असा तर्क आहे की, सोने-चांदी तुमच्या पैशाचं मूल्य टिकवून धरत असलं तरी, ते उत्पादक गुंतवणुकीप्रमाणं नवीन मूल्य किंवा संपत्ती निर्माण करत नाहीत. शेअर बाजारातील पैसा कंपन्या, पायाभूत सुविधा आणि नवनवीन संशोधनासाठी वापरला जातो, ज्यामुळे गुंतवणूकदारांना दीर्घकाळात मोठा फायदा होतो.
काय आहे 'जिओब्लॅकरॉक'?
मुकेश अंबानी यांनी रिलायन्स आणि जगातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी यांच्या संयुक्त उपक्रम असलेल्या 'जिओब्लॅकरॉक'बद्दलही माहिती दिली. त्यांचं लक्ष भारतातील गुंतवणूक बाजारपेठेत असलेल्या अफाट संधींवर आहे. सिस्टम रातोरात बदलणं हा उद्देश नसून, लाखो भारतीयांसाठी गुंतवणूक सोपी, सुरक्षित आणि सुलभ करणं हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितलं.
भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल विश्वास
भारताची मजबूत आर्थिक कामगिरी, स्थिर नेतृत्व आणि सातत्यपूर्ण धोरणांमुळे संपूर्ण जग भारताकडे आकर्षित होत असल्याचं अर्थव्यवस्थेबाबत बोलताना अंबानी म्हणाले. त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेची तुलना एका फळ देणाऱ्या झाडाशी केली. 'ब्लॅकरॉक'चे सीईओ लॅरी फिंक यांच्याशी संवाद साधताना त्यांनी, भारत ही जगातील सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून ८-१० टक्के विकास दर गाठणं आणि तो टिकवून ठेवणं शक्य असल्याचं त्यांनी म्हटलं.
Web Summary : Mukesh Ambani suggests investing in equities over solely relying on gold and silver. He highlights that India's economic growth requires channeling savings into productive assets like the stock market for greater wealth creation and economic benefit.
Web Summary : मुकेश अंबानी ने केवल सोने और चांदी पर निर्भर रहने के बजाय इक्विटी में निवेश करने का सुझाव दिया। उन्होंने कहा कि भारत की आर्थिक वृद्धि के लिए बचत को शेयर बाजार जैसे उत्पादक परिसंपत्तियों में लगाना अधिक धन सृजन और आर्थिक लाभ के लिए आवश्यक है।