लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दावोस येथे झालेला राज्य सरकारचा दौरा १०० टक्के यशस्वी झाला आहे. गुंतवणुकीसाठी गुरुवारपर्यंत ३७.२७ लाख कोटी रुपयांचे करार झाले असून त्याद्वारे ४३ लाख २५ हजार रोजगार होणार आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. काही उद्योजकांबरोबर बोलणी झाली असून एक-दोन महिन्यात ५ ते ६ लाख कोटींचे करार होणार आहेत, असे ते म्हणाले.
दावोसचा खर्च मांडणार
सामंत म्हणाले की, शासन म्हणून दावोसला जातात आणि इकडे फेक नरेटिव्ह पसरविण्याचा प्रयत्न केला जातो. पत्रकार परिषद घेणाऱ्यांनी एकदा गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरीला घेऊन जाऊ आणि किती उद्योग जमिनीवर आले ते दाखवू. तसेच दावोस दौऱ्यावर किती खर्च झाला ते मी मांडणार असल्याचे सामंत म्हणाले.
सर्वात जास्त गुंतवणूक कुठे?
सर्वाधिक गुंतवणूक एमएमआर विभागात येत आहे. एमएमआर विभागात गुंतवणुकीचे ३७ करार झाले असून त्याद्वारे २४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येत आहे आहेत.
Web Summary : Maharashtra government's Davos trip successful, securing ₹37.27 lakh crore in investments, creating 4.3 million jobs, according to Industry Minister Uday Samant. Further deals worth ₹5-6 lakh crore are expected soon, with the MMR region receiving the highest investment with ₹24 lakh crore.
Web Summary : महाराष्ट्र सरकार का दावोस दौरा सफल रहा, उद्योग मंत्री उदय सामंत के अनुसार ₹37.27 लाख करोड़ का निवेश प्राप्त हुआ, जिससे 43 लाख नौकरियां सृजित होंगी। ₹5-6 लाख करोड़ के अतिरिक्त सौदे जल्द होने की उम्मीद है, एमएमआर क्षेत्र में ₹24 लाख करोड़ का सर्वाधिक निवेश होगा।