नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने नवउद्योजकांना उद्योग व्यवसाय करण्यास आर्थिक मदत व्हावी म्हणून मोठ्या उत्साहाने मुद्रा लोनची व्यवस्था केली होती. मात्र आता या मुद्रा लोनबाबत रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला गंभीर इशारा दिला आहे. मुद्रा लोन हे बँकांच्या एनपीएचे पुढील कारण बनू शकते, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेच्या या इशाऱ्यामुळे आधीच संकटात असलेल्या बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. रिझर्व्ह बँकेने सांगितले की, प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत असलेल्या बॅड लोनचा आकडा 11 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. 2017-18 मध्ये आलेल्या प्रधानमंत्री मुद्रा लोनच्या वार्षिक अहवालामध्ये 2018 च्या आर्थिक वर्षांत या योजनेंतर्गत एकूण 2.46 ट्रिलीयन रुपये खर्च झाल्याचे म्हटले होते. या योजनेतील एकूण कर्जापैकी 40 टक्के कर्ज महिला उद्योजकांना तर 33 टक्के कर्जाचे वाटप सामाजिक विभागात करण्यात आले आहे. 2017-18 या काळात या योजनेंतर्गत 4.81 कोटींपेक्षा अधिकचा फायदा छोट्या कर्जदारांना पोहोचवण्यात आला होता. प्रधानमंत्री मुद्रा योजनेची सुरुवात 8 एप्रिल 2015 रोजी करण्यात आली होती. या योजनेंतर्गत बँका छोट्या उद्योजकांना 10 लाखांपर्यंतचे कर्ज देत होत्या. या कर्जाची तीन प्रकारांमध्ये विभागणी करण्यात आली होती. पहिल्या प्रकारात 50 हजार रुपये, दुसऱ्या प्रकारात 50 हजार 1 ते पाच लाख रुपयांपर्यंत आणि तिसऱ्या प्रकारात पाच लाख 1 ते 10 लाख रुपयांपर्यंत लोन देण्यात येते.
मुद्रा लोन ठरू शकते एनपीएचे कारण, रिझर्व्ह बँकेचा सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 22:27 IST
नवउद्योजकांना उद्योग व्यवसाय करण्यास आर्थिक मदत व्हावी म्हणून मोठ्या उत्साहाने सुरू करण्यात आलेल्या मुद्रा लोनबाबत रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला गंभीर इशारा दिला आहे.
मुद्रा लोन ठरू शकते एनपीएचे कारण, रिझर्व्ह बँकेचा सरकारला इशारा
ठळक मुद्देनवउद्योजकांना उद्योग व्यवसाय करण्यास आर्थिक मदत व्हावी म्हणून मोठ्या उत्साहाने सुरू करण्यात आलेल्या मुद्रा लोनबाबत रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला गंभीर इशारा दिला आहेमुद्रा लोन हे बँकांच्या एनपीएचे पुढील कारण बनू शकते, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहेप्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत असलेल्या बॅड लोनचा आकडा 11 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे