Join us

RBI Monetary Policy: व्याजदरात कोणताही बदल नाही; सर्व भारतीय वित्तीय संस्थांना ५० हजार कोटींचं कर्ज : शक्तिकांत दास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 11:21 IST

RBI Monetary Policy: रेपो दर चार टक्क्यांवर कायम, २०२१-२२ साठी जीडीपी वाढीचा दर १०.५ टक्क्यांवर राहण्याचा अंदाज

ठळक मुद्देरेपो दर चार टक्क्यांवर कायम२०२१-२२ साठी जीडीपी वाढीचा दर १०.५ टक्क्यांवर राहण्याचा अंदाज

RBI Monetary Policy: रिझर्व्ह बँकेकडून नव्या वित्तीय वर्षातील पहिलं पतधोरण आज (बुधवार) जाहीर करण्यात आलं. यापूर्वी कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन धोरणात्मक व्याजदर कायम ठेवले जाऊ शकतात, असं एका सर्वेक्षणात नमूद करण्यात आलं होतं. दरम्यान, २०२२ च्या पहिल्या पतधोरण समितीच्या बैठकीत व्याज दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिची रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. याशिवाय रेपो दरही ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहे. तर दुसरीकडे रिव्हर्स रेपो दरात कोणतेही बदल करण्यात आले नसून तेदेखील ३.३५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले होते. 

यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातदेखील व्याज दरात कोणतेही बदल करण्यात आले नसल्याची घोषणा शक्तिकांत दास यांनी केली होती. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या सावटादरम्यान रिझर्व्ह बँक व्याजदरात कोणतेही बदल करणार नाही अशी शक्यता काही जाणकारांनी व्यक्त केली होती.जीडीपी वाढ १०.५ टक्के राहण्याचा अंदाज"रेपो दर ४ टक्क्यांवर तर रिव्हर्स रेपो दर ३.३५ टक्क्यांवर कायम राहणार आहे. जोपर्यंत वाढ स्थिर होत नाही तोपर्यंत पॉलिसी रेट अकोमडेटिव्हच राहतील," असं दास यावेळी म्हणाले. २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढ १०.५ टक्के राहिल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. याशिवाय सर्व भारतीय वित्तीय संस्थांना ५० हजार कोटी रूपयांचं कर्ज दिलं जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकशक्तिकांत दासभारतकोरोना वायरस बातम्या