ratan tata : केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणांनंतर मध्यमवर्गीय सर्वात जास्त आनंदी आहे. मात्र, शेअर बाजाराला हा अर्थसंकल्प पसंत पडला नाही. गेल्या ६ ट्रेडिंग दिवसांत देशातील १० टॉप कंपन्यांपैकी ७ कंपन्यांनी प्रचंड नफा कमावला. ७ कंपन्यांच्या एकत्रित मार्केट कॅपमध्ये १,८३,३२२.५४ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यात देशातील सर्वात मोठी FMGC कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हरला सर्वाधिक फायदा झाला. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅपमध्ये देखील २५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. मात्र, दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या आवडत्या कंपनीला मात्र मोठा तोटा सहन करावा लागला आहे.
टीसीएसला सर्वाधिक तोटादेशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसला सर्वाधिक तोटा सहन करावा लागला. त्यांच्या मार्केट कॅपमध्ये २८ हजार कोटी रुपयांहून अधिक घसरण झाली आहे. एअरटेल आणि इन्फोसिसच्या मार्केट कॅपमध्येही घसरण दिसून आली. त्यामुळे या ३ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ४८,९२३.२३ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. जर आपण गेल्या आठवड्यात शेअर बाजाराबद्दल बोललो तर सेन्सेक्समध्ये १,३१५.५ अंकांची वाढ झाली असून शनिवारी ७७,५०५.९६ अंकांवर बंद झाला.
देशातील टॉप ५ कंपन्यांचे मार्केट कॅप
- देशातील सर्वात मोठ्या FMCG कंपन्यांपैकी एक असलेल्या हिंदुस्तान युनिलिव्हरचा एमकॅप ३२,४७१.३६ कोटी रुपयांनी वाढून ५,८९,०६६.०३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
- देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खाजगी कर्ज देणारी ICICI बँकेचे मूल्यांकन ३२,३०२.५६ कोटी रुपयांनी वाढून ८,८६,२४७.७५ कोटी रुपये झाले.
- देशातील सर्वात मोठी मोठी खाजगी कर्ज देणाऱ्या HDFC बँकेच्या नफ्यात ३०,८२२.७१ कोटी रुपयांची भर पडली आहे. त्यांचे मूल्यांकन १२,९२,४५०.६० कोटी रुपये झाले.
- देशातील सर्वात मोठ्या FMCG कंपन्यांपैकी एक असलेल्या ITC चे मूल्यांकन २६,२१२.०४ कोटी रुपयांनी वाढून ५,७८,६०४.०५ कोटी रुपये झाले आहे.
- रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य २५,३७३.२ कोटी रुपयांनी वाढून १७,११,३७१.५४ कोटी रुपयांवर पोहोचले.