Join us  

एकेकाळी हा व्यवसाय विकणार होते रतन टाटा; आता बनली 2.41 लाख कोटी रुपयांची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 4:46 PM

या कंपनीच्या शेअर्सनी चालू वर्षात गुंतवणूकदारांना सुमारे 90 टक्के परतावा दिला आहे.

Tata समूहाचे प्रमुख रतन टाटा (Ratan Tata) यांचे नाव खूप आदराने घेतले जाते. रतन टाटांनी आतापर्यंत अनेक क्षेत्रामध्ये हात आजमवला आणि त्यात यशस्वी होऊन दाखवले आहे. पण, याच रतन टाटांना एकेकाळी आपली एक मोठी कंपनी विकण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. 90 च्या दशकात इंडिका फ्लॉप झाल्यानंतर टाटांनी आपला टाटा मोटर्स व्यवसाय विकण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी ते अमेरिकेत गेले. ही कंपनी फोर्डला विकण्याचा निर्णय झाला, पण तिथे असे काही घडले की, त्यांनी कंपनी विकण्याचा निर्णय मागे घेतला. आता तीच टाटा मोटर्स 2.41 लाख कोटी रुपयांची कंपनी बनली आहे. 

टाटांनी व्यवसाय विकण्याचा निर्णय घेतला90 च्या दशकात रतन टाटा यांनी टाटा मोटर्सच्या बॅनरखाली टाटा इंडिका लॉन्च केली, परंतु कार फ्लॉप झाली. प्रतिसाद खूपच वाईट होता. कंपनीला तोटा होऊ लागला. त्यानंतर रतन टाटा यांनी प्रवासी कारचा व्यवसाय विकण्याचा निर्णय घेतला. ज्यासाठी त्यांनी अमेरिकन कार निर्माता कंपनी फोर्ड मोटर्सचे मालक बिल फोर्डशी चर्चा केली. त्यावेळी बिल फोर्ड यांनी रतन टाटांची खिल्ली उडवली होती आणि म्हटले होते की, त्यांना या व्यवसाय करता येत नाही. हा व्यवसाय विकत घेऊन ते टाटांवर उपकार करत आहेत.

कंपनी न विकता परत आले अन्...बिल फोर्डचे शब्द रतन टाटा यांना बाणासारखे टोचले. यानंतर टाटांनी व्यवसाय न विकण्याचा निर्णय घेतला आणि आपल्याच टाटा मोटर्सचा व्यवसाय वाढवण्यावर भर दिला आणि संपूर्ण जग टाटा मोटर्सचे यश पाहत आहे. कंपनी आज कोणत्या स्थितीत आहे, वेगळं सांगण्याची गरज नाही. टाटा मोटर्सचा ऑटो क्षेत्रात विशेषत: प्रवासी वाहनांमध्ये दबदबा आहे. टाटा मोटर्स आता ईव्हीवर लक्ष केंद्रित करत असून, येत्या काळात टेस्लासारख्या मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करणार आहे.

गुंतवणूकदारांची प्रचंड कमाईगुंतवणूकीच्या दृष्टिने बोललो तर टाटा मोटर्स आणि त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी 2023 वर्ष खूप चांगले गेले आहे. चालू वर्षात कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना सुमारे 90 टक्के परतावा दिला आहे. सध्या कंपनीच्या शेअर्सनी विक्रमी पातळी गाठली आहे. आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर वर्षाच्या सुरुवातीला टाटा मोटर्सचा शेअर 400 रुपयांपेक्षा कमीवर होते. आज त्याची किंमत 700 रुपयांच्या पुढे गेली आहे. सध्या कंपनीचे मूल्य 2.41 लाख कोटी रुपये झाले आहे.  

टॅग्स :रतन टाटाटाटाशेअर बाजारशेअर बाजारव्यवसायवाहन उद्योग