Join us  

रतन टाटांनी केली ‘या’ कंपनीत गुंतवणूक; कंपीनीचे शेअर्स १० टक्क्यांनी वधारले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 9:52 PM

सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांनी कंपनीत गुंतवणूक केल्यावर शेअर्सचा भाव एकदम वधारला, असे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देरतन टाटांकडून एका कंपनीत गुंतवणूकरतन टाटांनी गुंतवणूक करताच कंपनीचा शेअर्स भाव वधारलाकंपनीकडून देण्यात आली माहिती

मुंबई : देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा हजारोंच्या पटीत वाढल्याने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी बाजारात विक्रीचा सपाटा लावला. यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३९७ अंकांच्या घसरणीसह ५० हजार ३९५ अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय निर्देशांक असलेल्या निफ्टीतही १०१ अंकांची घसरण नोंदवली गेली आणि निर्देशांक १४ हजार ९२९ अंकांवर बंद झाला. शेअर बाजारात पडझड सुरू असताना मात्र प्रितीश नंदी कम्युनिकेशन्सचे शेअर्स तब्बल १० टक्क्यांनी वाढले. सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांनी प्रितीश नंदी कम्युनिकेशन्स या कंपनीत गुंतवणूक केल्याने शेअर्सचा भाव एकदम वधारला, असे सांगितले जात आहे. (ratan tata bought acquires stake in pritish nandy communication and share hike 10 percent) 

 टाटा कंपनीकडून स्टार्ट-अप आणि तंत्रज्ञान कंपन्यांत गुंतवणूक केली जात आहे. टाटा ट्रस्टचे अध्यक्ष आणि टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांनी गेल्या आठवड्यातील खरेदीत प्रितीश नंदी कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या वैयक्तिक क्षमतेत हिस्सा खरेदी केला आहे, अशी माहिती प्रितीश नंदी कम्युनिकेशन्सकडून देण्यात आली आहे. 

Fact Check: ३१ मार्चपर्यंत सर्व रेल्वेसेवा बंद? जाणून घ्या यामागील नेमकं सत्य

शेअर्समध्ये थेट १० टक्क्यांची वाढ

रतन टाटा यांनी प्रितीश नंदी कम्युनिकेशन्स या कंपनीत गुंतवणूक केल्याची माहिती बाजारात वाऱ्यासारखी पसरली. अनेक भागभांडवलदारांनी प्रितीश नंदी कम्युनिकेशन्सचे शेअर खरेदी करण्यास सुरुवात केली. याचाच परिणाम म्हणजे प्रितीश नंदी कम्युनिकेशन्सचे शेअर्स तब्बल ९.८० टक्क्यांनी वधारून २३.५५ अंकांवर बंद झाले. प्रितीश नंदी हे प्रसिद्ध चित्रपटाचे निर्माते तसेच माजी खासदारही राहिले आहेत.

कंपनीची आर्थिक कामगिरी सुधारली

सन १९९३ मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली होती.  कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्नविषयी बोलायचे झाल्यास प्रवर्तकांची भागीदारी आता ५४.८४ टक्के झाली आहे. गेल्या काही तिमाहीत कंपनीची आर्थिक कामगिरी सुधारली आहे. जून आणि सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीने आपले नुकसान कमी केले. या कंपनीने चमेली, कांटे, झंकार बीट्स यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली असून, अॅमेझॉनवरील ‘Four More Shots Please’ ही मालिका या कंपनीने तयार केली आहे. 

टॅग्स :रतन टाटाशेअर बाजार