Join us

Rapido महिलांसाठी खास सर्व्हिस सुरू करणार, २५ हजार महिलांना रोजगार मिळणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 16:29 IST

Pink Rapido : रॅपिडो ही देशातील तीन प्रमुख कॅब सर्व्हिस देणारी कंपनी आहे, जी देशभरात टॅक्सी, ऑटो आणि बाईकने प्रवास करण्याची सुविधा पुरवते. 

Pink Rapido : देशातील नामांकित कॅब अ‍ॅग्रीगेटर कंपनी रॅपिडो लवकरच महिलांसाठी एक खास सर्व्हिस सुरू करणार आहे. या सर्व्हिसद्वारे कंपनी जवळपास २५ हजार महिलांना रोजगार सुद्धा देणार आहे. दरम्यान, रॅपिडो ही देशातील तीन प्रमुख कॅब सर्व्हिस देणारी कंपनी आहे, जी देशभरात टॅक्सी, ऑटो आणि बाईकने प्रवास करण्याची सुविधा पुरवते. 

आतापर्यंत रॅपिडोमध्ये फक्त पुरुषच कॅब, ऑटो आणि बाईक चालवू शकत होते. मात्र, आता रॅपिडो बाईक चालवणारी महिला दिसणार आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे कॅब बुकिंग सुविधा देणारी कंपनी रॅपिडो कर्नाटकात 'पिंक रॅपिडो' बाईकचा नवीन ताफा आणणार आहे. ही सर्व्हिस विशेषतः महिलांसाठी असणार आहे. 

कंपनीने शुक्रवारी सांगितले की, हा उपक्रम या वर्षाच्या अखेरीस सुरू केला जाईल. ही सर्व्हिस आधी कर्नाटकातील बंगळुरू शहरात सुरू केली जाऊ शकते. कंपनीचे सह-संस्थापक पवन गुंटुपल्ली यांनी येथे झालेल्या जागतिक गुंतवणूकदार परिषदेत एका प्रश्नाचे उत्तर देताना या उपक्रमाची घोषणा केली. रॅपिडो बाईकवर महिला चालकांना सहभागी करून महिलांसाठी २५,००० रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असे पवन गुंटुपल्ली यांनी सांगितले.

पिंक रॅपिडोमुळे महिलांना सुरक्षित वाटेलकॅब, ऑटो आणि बाईक चालकांकडून महिलांशी होणाऱ्या गैरवर्तनाच्या बातम्या तुम्ही सोशल मीडियावर अनेकदा पाहिल्या असतील. अशा परिस्थितीत, रॅपिडोची पिंक सर्व्हिस महिलांना पूर्णपणे सुरक्षित अनुभव देईल, कारण पिंक रॅपिडोमध्ये बाईक चालवणारी कॅप्टन देखील एक महिला असणार आहे.

टॅग्स :व्यवसायवाहनबाईक