Join us  

भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनेल? RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 6:10 PM

Raghuram Rajan on India 2047: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

Raghuram Rajan on India 2047: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. येत्या काही वर्षांत भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे पंतप्रधान मोदी अनेकदा म्हणतात. पण, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. 'भारताच्या आर्थिक विकासाबाबत ज्या प्रकारे ‘प्रचार’ केला जातोय, त्यावर विश्वास ठेवणे मोठी चूक असेल,' अशी प्रतिक्रिया रघुराम राजन यांनी दिली.

गुंतवणुकीचा प्रभावी नियम; किती वर्षात पैसे दुप्पट होतील? जाणून घ्या 'रुल ऑफ 72'

एका माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत रघुराम राजन म्हणतात की, 'देशात अनेक संरचनात्मक समस्या आहेत, त्या आधी सोडवणे गरजेचे आहे. सध्या देशात शिक्षण आणि कामगारांचे कौशल्य सुधारण्याचे सर्वात मोठे आव्हान आहे. 2047 पर्यंत भारत विकसित देश बनू शकणार नाही. याचे कारण म्हणजे, जर मुले शिक्षणही घेऊ शकली नाहीत, तर अशाप्रकारचे दावे करणे मूर्खपणाचे ठरेल. देशातील कर्मचाऱ्यांना रोजगारक्षम बनवणे, रोजगार निर्मिती करणे, शिक्षण देणे, यावर सर्वाधिक काम केले पाहिजे.'     

रेल्वे स्टॉक्स सुस्साट; IRFC-RVNL च्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी, तुमच्याकडे आहे का..?

'देशातील 1.4 अब्ज लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक लोकसंख्या 30 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. सरकारचे दावे खरे करण्यासाठी देशाला अजून बरीच वर्षे कठोर परिश्रम करावे लागतील. शिक्षण व्यवस्था ठीक करण्याऐवजी सरकार चिप उत्पादनासारख्या हाय-प्रोफाइल प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करत आहे. भारताची शासन व्यवस्था खूप केंद्रीकृत आहे, राज्यांवर नियंत्रण सोपवल्यास अधिक विकास करण्यात मदत होईल. भारताला 8 टक्के विकास दर गाठण्यासाठी अजून खूप काम करावे लागेल", असेही रघुरान राजन यांचे म्हणने आहे.

टॅग्स :रघुराम राजनभारतीय रिझर्व्ह बँकभारतअर्थव्यवस्थाभाजपा