Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुतीन यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे फाईव्ह स्टार हॉटेल्सची चांदी, किमान भाडं ₹८५ हजारांच्या पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 15:49 IST

Putin India Visit: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा दिल्ली दौरा हा देशातील एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. ते स्वतः एका मोठ्या शिष्टमंडळासह येत आहेत. या भेटीमुळे राष्ट्रीय राजधानीतील पंचतारांकित हॉटेल्समध्ये उत्साह निर्माण झालाय.

Putin India Visit: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा दिल्ली दौरा हा देशातील एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. ते स्वतः एका मोठ्या शिष्टमंडळासह येत आहेत. या भेटीमुळे राष्ट्रीय राजधानीतील पंचतारांकित हॉटेल्समध्ये उत्साह निर्माण झालाय. या आठवड्यात खोल्या जवळजवळ भरल्या आहेत आणि दर गगनाला भिडले आहेत.

यावेळी दिल्लीत अनेक कार्यक्रम

नोव्हेंबरमध्ये उत्तर भारतात पर्यटन हंगाम सुरू होतो, तेव्हा मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय प्रवासी येत असतात. याव्यतिरिक्त, या आठवड्यात दिल्लीत अनेक प्रमुख कार्यक्रम होत आहेत, ज्यात भारत मंडपम येथे कर आकारणी बैठक, यशोभूमी येथे पेपर एक्स्पो आणि युनेस्को बैठक यांचा समावेश आहे. लग्नाचा हंगाम देखील सुरू आहे. दरम्यान, टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या सर्व गोष्टींमुळे आठवड्याच्या शेवटी पंचतारांकित हॉटेल्समध्ये सरासरी खोलीचे दर ₹८५,००० ते ₹१.३ लाखांपर्यंत वाढले आहेत.

पुतीन कुठे थांबवणार?

पुतिन यांच्या निवासाची व्यवस्था दिल्लीतील सुप्रसिद्ध आयटीसी मौर्या हॉटेलमधील 'प्रेसीडेंशियल सुट' मध्ये करण्यात आली आहे. या सुटला 'चाणक्‍य सुट' म्हणूनही ओळखले जाते. याच चाणक्य सुटमध्ये यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि जो बायडेन यांच्यासारखे ग्लोबल आयकॉनही थांबले आहेत. पुतिन यांच्या सुरक्षेसाठी रशियन सुरक्षा पथक भारतात दाखल झाले असून, त्यांनी या निवासस्थानाची पाहणी पूर्ण केली आहे.

आयटीसी मौर्या : ४० वर्षांची परंपरा आणि भव्यता

आयटीसी मौर्या हे हॉटेल गेल्या ४० वर्षांपासून भारत भेटीवर येणाऱ्या राष्ट्राध्यक्षांचे आणि जागतिक नेत्यांचे आवडते ठिकाण राहिले आहे. या हॉटेलमध्ये एकूण ४११ खोल्या आणि २६ सुट्स आहेत. यात बुखारा आणि दम पुख्तसारखे अनेक पुरस्कार विजेते रेस्टॉरंट्स आहेत. भव्य कॉन्फरन्स आणि बँक्वेट व्हिन्यू, उत्कृष्ट वेलनेस सुविधा आणि शाही जेवणाचा अनुभव हे या हॉटेलचे वैशिष्ट्य आहे.

'चाणक्‍य सुट'ची शाही ओळख

राजधानीत २००७ मध्ये या हॉटेलची स्थापना झाली. चंद्रगुप्त मौर्याला सत्ता मिळवून देणारे महान अर्थतज्ज्ञ आणि रणनीतीकार चाणक्य यांचं नाव हॉटेलला देण्यात आलं. ४,६०० चौरस फुटांमध्ये पसरलेला हा सुट त्याच्या अप्रतिम सजावटीसाठी आणि वास्तूशैलीसाठी ओळखला जातो. रेशमी कपड्यांनी सजलेली आर्ट-वॉल्स पाहुण्यांना एका शाही गॅलरीतून चाणक्य यांच्या भव्य मूर्तीकडे घेऊन जातात. या सुटमध्ये मास्टर बेडरूम, वॉक-इन वॉर्डरोब, खाजगी स्टीम रूम, सौना, जिम, १२ आसनांची डाइनिंग रूम, गेस्ट रूम, स्टडी आणि ऑफिस स्पेस यांसारख्या खास सुविधा आहेत. अजीज आणि तैयब मेहता यांसारख्या प्रतिष्ठित कलाकारांच्या दुर्मिळ कलाकृतीही येथे सजवलेल्या आहेत.

एका रात्रीचा खर्च ८ ते १० लाख रुपये

या शाही सुविधांचा अनुभव घेण्यासाठी एका दिवसाचा खर्च सुमारे ८ ते १० लाख रुपये आहे. येथे थांबणाऱ्या पाहुण्यांना त्यांच्या इच्छेनुसार जगातील कोणत्याही भागातील विशिष्ट सामग्री वापरून बनवलेली कोणतीही डिश ऑर्डर करण्याचा विशेष विशेषाधिकार मिळतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Putin's Delhi Visit Boosts Luxury Hotels; Prices Soar

Web Summary : Putin's Delhi visit, coupled with events and wedding season, has caused a surge in luxury hotel prices, reaching ₹85,000 per night. He will reside in ITC Maurya's presidential suite, previously favored by global leaders. The suite offers opulent amenities and bespoke dining.
टॅग्स :रशियाव्लादिमीर पुतिनभारतदिल्ली