Join us
Daily Top 2Weekly Top 5

RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा जगात डंका; वाढवला तिरंग्याचा मान, PM मोदींनीही केला "सलाम"!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 15:08 IST

या यादीत तीन केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांना 'ए प्लस' रेटिंग देण्यात आली आहे. यात दास सर्वात वरच्या क्रमांकावर आहेत. 

भारतीय रिझर्व्ह बैंकेचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikant Das) यांनी संपूर्ण जगात आपला डंका वाजवला आहे. अमेरिकेतील ग्लोबल फायनान्स या मासिकाने त्यांना जागतिक पातळीवरील सर्वोच्च केंद्रीय बँकरचा दर्जा दिला आहे. दास यांना ग्लोबल फायनान्स केंद्रीय बँकर रिपोर्ट कार्ड 2023 मध्ये 'ए प्लस' रेटिंग देण्यात आली आहे. या यादीत तीन केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांना 'ए प्लस' रेटिंग देण्यात आली आहे. यात दास सर्वात वरच्या क्रमांकावर आहेत. 

ग्लोबल फायनान्सने एका निवेदनात म्हटले आहे, महागाईवरील नियंत्रण, आर्थिक वाढीचे लक्ष्य, चलन स्थिरता आणि व्याजदर व्यवस्थापनातील यशासाठी ग्रेड 'A' ते 'F' पर्यंतचे स्केल असतात. 'ए' उत्कृष्ट प्रदर्शन दर्शवते, तर एफ ग्रेड म्हणजे, पूर्मपणे अयशस्वी. दास यांच्यानंतर, स्वित्झर्लंटचे गव्हर्नर थॉमस जे जॉर्डन आणि व्हिएतनामचे गव्हर्नर गुयेन थी होंग यांचा क्रमाक लागतो.

RBI ने एक ट्विट करत म्हटले आहे, ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड्स 2023 मध्ये गव्हर्नर शक्तिकांत दास यांना A+ रेटिंग देण्यात आली आहे. तीन सेंट्रल बँकांना A+ रेटिंग देण्यात आली आहे. यात दास यांना सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे. हे मासिक 1994 पासून धर वर्षी सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड तयार करते. संपूर्ण जगातून 100 हून अधिक देशांचे सेंट्रल बँकांचे आकलन करून हे कार्ड तयार करते. 

पंतप्रधान मोदींनी केलं अभिनंदन - या सन्मानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शक्तिकांत दास यांचे अभिनंदन केले आहे. ट्विट करत मोदी म्हणाले, 'आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे अभिनंदन. भारतासाठी हा गौरवाचा क्षण आहे. जो जगात आपले आर्थिक नेतृत्व दर्शवतो. शक्तिकांत दास यांचे समर्पण आणि दूरदृष्टी आपल्या देशाची विकास यात्रा बळकट करत आहे.' 

केवळ भारत, स्वित्झर्लंड आणि व्हिएतनामच्या सेंट्रल बँकांच्या गव्हर्नरांनाच ए+ ग्रेड मिळाला आहे. ब्राझील, इस्रायल, मॉरीशस, न्यूझीलँड, पॅराग्वे, पेरू, तैवान आणि उरुग्वेला ए ग्रेड मिळाला आहे. तर कोलंबिया, डोमिनिकन रिपब्लीक, आइसलँड, इंडोनेशिया, मॅक्सिको, मोरक्को, नॉर्वे, दक्षिण अफ्रीका, दक्षिण कोरिया आणि श्रीलंकेला ए- ग्रेड मिळाला आहे.

टॅग्स :नरेंद्र मोदीशक्तिकांत दासभारतीय रिझर्व्ह बँकअमेरिका