Join us

होळीपूर्वी शेतकऱ्यांना सरकारची मोठी भेट! 24 फेब्रुवारीला मिळणार PM किसानचे पैसे; असे तपासा स्टेटस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 15:01 IST

PM Kisan 19th Installment Date 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान सन्मान निधीचा १९वा हप्ता उद्या म्हणजेच २४ फेब्रुवारी रोजी जारी करतील. याचे स्टेटस तुम्ही मोबाईलवरुन चेक करू शकता.

PM Kisan 19th Installment Date 2025 : देशातील ९.८ कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. PM किसान सन्मान योजनेचा १९वा हप्ता सोमवारी (२४ फेब्रुवारी) थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरीत केला जणार आहे. केंद्र सरकार २२ हजार कोटी रुपयांचा निधी देणार आहे. पीएम-किसान योजनेअंतर्गत, प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला दर चार महिन्यांनी २,००० रुपयांच्या ३ समान हप्त्यांमध्ये ६,००० रुपयांचा वार्षिक लाभ दिला जातो. दरम्यान, तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले की नाही? हे कसं चेक करणार?

प्रधान मंत्री किसान सन्मान निधीचा १८वा हप्ता ऑक्टोबर २०२४ मध्ये देण्यात आला होता. आता या योजनेचा १९वा हप्ता २४ फेब्रुवारी रोजी जारी केला जाणार आहे. या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने २०१९ मध्ये सुरू केली होती. तेव्हापासून पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत आहे.

९.८ कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील भागलपूर येथून पीएम किसानचा १९ वा हप्ता जारी करणार आहेत. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. ते म्हणाले की, पंतप्रधान २४ फेब्रुवारीला भागलपूरमधऊन पीएम-किसानचा १९वा हप्ता जारी करतील. एकूण २२,००० कोटी रुपये थेट ९.८ कोटी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले जातील.

पीएम किसानचा हप्ता कसा चेक करायचा?जर तुम्ही तुमची सर्व कागदपत्रे बरोबर सबमिट केली असतील. तुमचे ई-केवायसी पूर्ण असेल तर पीएम किसानचा १९वा हप्ता नक्की मिळेल. या हप्त्याची स्थिती तुम्ही घरबसल्या मोबाईलवर तपासू शकता.

पीएम किसान स्टेटस कसे तपासावे?

  • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्ही तुमची स्टेटस अशा प्रकारे तपासू शकता.
  • अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
  • आता, पेजच्या उजव्या बाजूला ‘नो युवर स्टेटस’ टॅबवर क्लिक करा.
  • तुमचा नोंदणी क्रमांक एंटर करा आणि कॅप्चा कोड भरा आणि 'डेटा मिळवा' पर्याय निवडा.
  • यानंतर तुम्हाला तुमच्या टॅबच्या स्क्रीनवर संपूर्ण स्टेटस दिसेल.
टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाशेतकरी