Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता प्लास्टिकही पोळणार! इराण युद्धामुळे बादल्या, डबे ते औषधांच्या किमतीत मोठी वाढ होणार; कोणत्या वस्तू महागणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 08:10 IST

Plastic Price Hike 2026 : इराण-अमेरिका युद्धामुळे प्लास्टिकच्या कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ. बादल्या, डबे, पाण्याच्या बाटल्या आणि औषधे महागणार. IOCL कडून पॉलिमर दरात वाढ. वाचा सविस्तर परिणाम.

इराण-अमेरिका युद्धामुळे केवळ पेट्रोल-डिझेलच नाही, तर आता तुमच्या स्वयंपाकघरातील प्लास्टिकचे डबे, बादल्या आणि अगदी औषधांच्या किमतीही कडाडणार आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे कच्च्या मालाच्या (पॉलिमर) किमतीत मोठी वाढ झाली आहे. भारतातील कंपनी IOCL ने २५ मार्च रोजी प्लास्टिकच्या कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ केल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे.

'बिजनेस टुडे'च्या वृत्तानुसार, होमोपॉलिमर पॉलीप्रोपाइलीन (PPH) च्या किमतीत प्रति टन ४,००० रुपयांची, तर कोपॉलिमर आणि पॉलीइथिलीन (PE) च्या दरात प्रति टन ७,००० रुपयांची वाढ झाली आहे. या महिन्यात तब्बल चार वेळा (१, ३, ११ आणि २५ मार्च) हे दर वाढवण्यात आले आहेत.

कोणत्या वस्तू महागणार?पॉलिमरचा वापर दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंमध्ये होतो. त्यामुळे खालील वस्तूंच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे:

खाद्यपदार्थ: बिस्किटे, वेफर्स आणि इतर पॅकेज्ड फूड.

पेय पदार्थ: पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, ज्यूस आणि कोल्ड ड्रिंक्स.

घरगुती वस्तू: प्लास्टिकच्या बादल्या, मग, टब, डबे आणि कंटेनर्स.

औषधे आणि आरोग्य सेवाही महागणार सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, प्लास्टिक दरवाढीचा फटका आरोग्य क्षेत्रालाही बसणार आहे. 'असोसिएशन ऑफ इंडियन मेडिकल डिव्हाइस इंडस्ट्री' नुसार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे प्लास्टिकच्या खर्चात ५०-६०% वाढ झाली आहे. यामुळे इंजेक्शनच्या सिरिंज, आयव्ही (IV) बाटल्या, डायग्नोस्टिक किट आणि औषधांचे पॅकेजिंग, सर्जिकल हातमोजे यांच्या किमती एप्रिल महिन्यापासून वाढू शकतात.

कंपन्यांची नवी खेळीतज्ज्ञांच्या मते, कंपन्या अचानक किमती वाढवण्याऐवजी उत्पादनाचे वजन किंवा आकार कमी करू शकतात. उदाहरणार्थ, १० रुपयांच्या बिस्किट पुड्याची किंमत तीच ठेवून त्यातील बिस्किटांची संख्या कमी केली जाऊ शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran War: Plastic Price Hike Looms, Impacting Essentials and Medicines

Web Summary : The Iran-America conflict disrupts supply chains, spiking plastic raw material costs. Expect price hikes for food packaging, beverages, household items, and crucial medicines. Companies might reduce product size instead of raising prices.
टॅग्स :अमेरिका-इस्रायल-इराण वॉरइराणयुद्धमहागाई