PG Electroplast Share Price: मल्टीबॅगर कंपनी पीजी इलेक्ट्रोप्लास्टच्या शेअर्समध्ये सतत्यानं घसरण होत आहे. सोमवारी बीएसईवर इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान पीजी इलेक्ट्रोप्लास्टचे शेअर्स १९ टक्क्यांहून अधिक घसरून ४७३.२० रुपयांवर पोहोचले. शुक्रवारी कंपनीचे शेअर्स इंट्राडे २३ टक्क्यांनी घसरले. गेल्या पाच दिवसांत पीजी इलेक्ट्रोप्लास्टचे शेअर्स ४० टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या निकालांनंतर आणि संपूर्ण वर्षाच्या रेव्हेन्यू ग्रोथ गाईडंन्समध्ये घट झाल्यानंतर पीजी इलेक्ट्रोप्लास्टच्या शेअर्समध्ये ही घसरण दिसून आली.
या वर्षी हा शेअर निम्म्याहून अधिक घसरण
या वर्षी पीजी इलेक्ट्रोप्लास्टचे शेअर्स निम्म्याहून अधिक घसरले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारी २०२५ रोजी पीजी इलेक्ट्रोप्लास्टचे शेअर्स १०२२.८५ रुपयांवर होते. ११ ऑगस्ट २०२५ रोजी कंपनीचे शेअर्स ४७३.२० रुपयांवर पोहोचलेत. या वर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ५० टक्क्यांहून अधिक घसरण झाली. त्याच वेळी, गेल्या पाच दिवसांत पीजी इलेक्ट्रोप्लास्टचे शेअर्स ४० टक्क्यांनी घसरले. ५ ऑगस्ट २०२५ रोजी मल्टीबॅगर कंपनीचे शेअर्स ७९१.३० रुपयांवर होते. ११ ऑगस्ट २०२५ रोजी कंपनीचे शेअर्स ४७३.२० रुपयांवर पोहोचलेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
शेअर्समध्ये अनेक ब्लॉक डील्स
सोमवारी पीजी इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेडमध्ये अनेक ब्लॉक डील्स झाल्या. या ब्लॉक डील्समध्ये १.०४ कोटी शेअर्स किंवा कंपनीच्या थकबाकीच्या ३.७% व्यवहार झाले. हे डील ५०० रुपये प्रति शेअर या किमतीत झाले. या व्यवहाराचं एकूण मूल्य ५२६ कोटी रुपये आहे.
टार्गेट प्राईज केली कमी
ब्रोकरेज फर्म नुवामानं पीजी इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेडच्या शेअर्सवर बाय रेटिंग कायम ठेवलं आहे. दरम्यान, नुवामानं कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राईज कमी केली. ब्रोकरेज हाऊसनं पीजी इलेक्ट्रोप्लास्टच्या शेअर्सची टार्गेट प्राईज ३५ टक्क्यांनी कमी केली. ब्रोकरेज हाऊसनं यापूर्वी कंपनीच्या शेअर्ससाठी ११०० रुपयांचं टार्गेट दिलं होतं, जे आता ७१० रुपयांपर्यंत कमी करण्यात आलंय.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)