नवी दिल्लीः कर्मचारीभविष्य निर्वाह निधीचा व्याजदर गेल्या काही दिवसांपूर्वीच 8.65 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे खात्यात जमा असलेल्या पैशांवरही चांगली वाढ होत आहे. ईपीएफओच्या वेबसाइटच्या माध्यमातूनही आपण जमा रकमेची माहिती मिळवू शकतो. तसेच ईपीएफओमध्ये नोंदणी असलेल्या मोबाइलवरून मिस कॉल्ड दिल्यावरही मेसेजद्वारे जमा रकमेची माहिती मिळते. परंतु आता उमंग अॅपद्वारेसुद्धा आपल्या खात्यात किती रक्कम जमा आहे ते समजणार आहे.लोकांना एका क्लिकवर सरकारी खात्यांशी संपर्क साधता आला पाहिजे, यासाठी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान खात्याने उमंग हे अॅप विकसित केले आहे. या अॅपच्या माध्यमातून ग्राहक कर्मचारीभविष्य निर्वाह निधी, पॅन, आधार, डिजिलॉकर, गॅस बुकिंग, मोबाइल बिल पेमेंट, लाइट बिल पेमेंट इत्यादी कामं होणार आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांशी संबंधित सुमारे अनेक सेवांची सुविधा उमंगमध्ये देण्यात आली आहे. उमंग अॅप हे स्मार्टफोन, डेस्कटॉप, टॅबलेट या सर्व माध्यमांवर डाऊनलोड करता येते.
PFवरील व्याज लवकरच जमा होतंय; SMS, मिस्ड कॉल अन् अॅपद्वारे 'असा' जाणून घ्या बॅलन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 12:33 IST