Join us

Petrol Diesel Price: आजचे पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 15:17 IST

सरकारने काही महिन्यांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली होती...

Petrol Diesel Price : तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. आजही पेट्रोल कंपन्यांनी तेलाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. सरकारने काही महिन्यांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. देशातील तेलाच्या किंमती एक महिन्यांहून अधिक काळ स्थिर आहेत.

पुणे शहरात आज पेट्रोलचे दर प्रति लिटर 105. 82 रुपये तर डिझेल 92.35 रुपये आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोलचा दर 106.3 रुपये तर डिझेल 92.76 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आहे तर डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लीटर आहे. चेन्नईमध्येही पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे.

जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर-

आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमत एसएमएसद्वारेही कळू शकतात. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन, तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो, जो तुम्हाला IOCL वेबसाइटवरून मिळेल.

टॅग्स :पेट्रोलडिझेलपुणेमहागाईमुंबईकोलकाता दक्षिणदिल्लीचेन्नई