मुंबई : पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठ्याच्या मुळावरच घाव बसला असून त्याचे थेट परिणाम पेट्रोल-डिझेल दरांवर उमटू लागले आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीवरील तणाव वाढताच कच्च्या तेलाने झेप घेतली आणि त्यानंतर जगभरात इंधन दरांचा अक्षरशः दरस्फोट झाला आहे. ९५ देशांमध्ये पेट्रोल-डिझेल महागले असून, काही ठिकाणी तर ही दरवाढ ६८ टक्क्यांपर्यंत आहे.
आकडेवारीनुसार, २३ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत किमान ९५ देशांमध्ये पेट्रोल दर वाढले. काही बाजारांमध्ये ही वाढ जवळपास ७०% पर्यंत पोहोचली आहे, विशेषतः आयात-आधारित अर्थव्यवस्थांमध्ये ती अधिक तीव्र दिसून आली.
पेट्रोल दर सर्वाधिक कुठे वाढलेदेश दरवाढकंबोडिया +६७.८%व्हिएतनाम +४९.७%नायजेरिया +३५%लाओस +३२.९%कॅनडा +२८.४%पाकिस्तान +२४% अमेरिका +१६.५%जर्मनी +१३.३%फ्रान्स +६.४%
सर्वसामान्य अमेरिकन लोकांना युद्धाची झळअमेरिकेत पेट्रोल दर फेब्रुवारीतील प्रति गॅलन २.९४ डॉलरवरून ३.५८ डॉलरपर्यंत म्हणजेच जवळपास २०% वाढले, तर अमेरिकेतील काही राज्यांमध्ये दर ४ डॉलरच्या वर गेले आणि कॅलिफोर्नियामध्ये ५ डॉलरचा टप्पा ओलांडला.
सध्या भारतात काय स्थिती? जागतिक स्तरावर इंधन दर वाढत असताना भारतात मात्र पेट्रोल-डिझेल दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. २८ फेब्रुवारी ते १९ मार्च दरम्यान प्रमुख शहरांमध्ये कोणताही बदल झाला नाही.
पेट्रोलचा भाव (प्रती लिटर)९४.७७ ₹ - दिल्ली १०३.५० ₹ - मुंबई
भारतात दर स्थिर का?भारतामध्ये इंधन दर पूर्णपणे बाजाराशी जोडलेले नाहीत. त्यामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ ग्राहकांपर्यंत लगेच पोहोचत नाही व एक प्रकारची तात्पुरती तफावत निर्माण होते.
Web Summary : Global fuel prices surge up to 68% across 95 countries due to war, impacting import-dependent economies. While the US sees a price hike, India maintains stable fuel prices due to market decoupling.
Web Summary : युद्ध के कारण 95 देशों में वैश्विक ईंधन की कीमतें 68% तक बढ़ीं, जिससे आयात-आधारित अर्थव्यवस्थाएं प्रभावित हुईं। अमेरिका में मूल्य वृद्धि देखी गई, जबकि भारत ने बाजार के अलग होने के कारण ईंधन की कीमतें स्थिर रखीं।