Join us  

Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट! भारतात मात्र सलग २४ व्या दिवशी इंधनदर ‘जैसे थे’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 9:34 AM

Petrol Diesel Price: पेट्रोलियम कंपन्यांनी सलग २४ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर ठेवले आहेत.

ठळक मुद्देसलग २४ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दर स्थिरभोपाळमध्ये पेट्रोलचा सर्वाधिक दर१७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलची किंमत ही १०० रुपये प्रति लीटरवर

मुंबई: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्याचे सांगितले जात आहे. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ४.१३ टक्क्यांनी घसरला आणि ६५.५२ डॉलर प्रती बॅरल झाला. त्याचबरोबर ब्रेंट क्रूडचा भाव ३.८८ टक्क्यांनी कमी झाला आणि ६८ डॉलर प्रती बॅरल इतका खाली आला आहे. गेल्या आठवड्यात ब्रेंट क्रूडचा भाव ७०.७० डॉलरवर बंद झाला होता. मात्र, संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणतीही वाढ केलेली नसून, सलग २४ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर ठेवले आहेत. (petrol diesel price unchanged from last 24 days and know latest today fuel rates in india)

आता बुलेट ट्रेनने अयोध्येला जाता येणार; दिल्ली-वाराणसी मार्गावर १२ स्थानके निश्चित!

देशभरात पेट्रोल आणि डिझलचे दर सार्वकालिक उच्चांकावर आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर जवळपास १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलची किंमत ही १०० रुपये प्रति लीटरपर्यंत गेली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, लडाख, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, बिहार, केरळ, पंजाब, सिक्कीम, दिल्ली, पुडुचेरी आणि पश्चिम बंगालचा समावेश असून, भोपाळमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा सर्वाधिक दर असल्याचे पाहायला मिळत आहे.

भन्नाट संधी! Amul ची फ्रेंचायझी घ्या अन् २ लाखांच्या गुंतवणुकीवर १० लाखांचा नफा मिळवा

भोपाळमध्ये पेट्रोलचा सर्वाधिक दर

मुंबईत एक लीटर पेट्रोलचा दर १०७.८३ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.८४ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा दर १०२.४९ रुपये इतका आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०२.०८ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११०.२० रुपयांवर कायम आहे. बंगळुरात पेट्रोल १०५.२५ रुपये झाले आहे.

अभिमानास्पद! मराठी उद्योजक, मसाला किंग धनंजय दातार यांचा दुबईत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरव

डिझेलचा सर्वाधिक दर कुठे?

मुंबईत डिझेलचा दर ९७.४५ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत डिझेल ८९.८७ रुपये आहे. चेन्नईत ९३.६३ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९३.०२ रुपये प्रती लीटरवर कायम आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.६७ रुपये झाला आहे. तर, बंगळुरात डिझेल ९५.२६ रुपये आहे. दरम्यान, यापूर्वी १७ जुलै २०२१ रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली होती.  

टॅग्स :इंधन दरवाढपेट्रोलडिझेलव्यवसाय