Join us

केवळ ११ रुपयांमध्ये परदेशवारी, होळीच्या निमित्तानं 'या' एअरलाइन्सनं आणली भारतीयांसाठी विशेष ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 11:28 IST

Cheap Airfare: तुम्हीही परदेशात जाण्याचं स्वप्न पाहात आहात पण कमी बजेटमुळे जाऊ शकत नाही का? परंतु आता व्हिएतनामची व्हिएतजेट विमान कंपनी तुमचे स्वप्न पूर्ण करणार आहे.

Cheap Airfare: तुम्हीही परदेशात जाण्याचं स्वप्न पाहात आहात पण कमी बजेटमुळे जाऊ शकत नाही का? परंतु आता व्हिएतनामची व्हिएतजेट विमान कंपनी तुमचे स्वप्न पूर्ण करणार आहे. जे परदेशात जाण्यासाठी केवळ ११ रुपयांत तिकीट देत आहेत.

होळीचा सण भारतीयांसाठी आणखी खास करण्यासाठी व्हिएतनामची विमान कंपनी व्हिएतजेटनं एक खास ऑफर आणली आहे. एकतर्फी इकॉनॉमी क्लास प्रवासासाठी भारतीयांना केवळ ११ रुपये मोजावे लागणार आहेत. या ऑफरअंतर्गत २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत केवळ ११ रुपयांमध्ये तिकीट बुक करता येणार आहे. यात कर आणि विमानतळ शुल्काचा समावेश नाही, म्हणजेच प्रवाशांना त्याचे पैसे वेगळे भरावे लागणारेत.

१० मार्च ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत प्रवाशांना या ऑफर अंतर्गत प्रवास करता येणार आहे. या सेलचा फायदा भारतातील शहरांमधून व्हिएतनाममधील शहरांकडे जाणाऱ्या विमानांना मिळणार आहे.

या शहरांमधून विमानसेवा

दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, कोची आणि अहमदाबाद येथून व्हिएतनामसाठी विमान बुक करता येईल. होळीचा मुहूर्त लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेल्या या खास ऑफरअंतर्गत तिकीट बुक करण्यासाठी प्रवाशांना व्हिएतजेटची अधिकृत वेबसाइट www.vietjetair.com किंवा व्हिएतजेट एअरच्या मोबाइल अॅपवर जावं लागणार आहे. या सेलची संपूर्ण माहिती दोन्ही ठिकाणी उपलब्ध असून तिथून तिकिटेही बुक करता येणार आहेत.

मार्चपासून नवीन उड्डाणे सुरू होणार 

व्हिएतनाममधील हो ची मिन्ह शहरातून बेंगळुरू आणि हैदराबादसाठी मार्चपासून दोन थेट उड्डाणं सुरू होणार आहेत. या दोन नव्या उड्डाणांनंतर दर आठवड्याला भारत आणि व्हिएतनाम दरम्यान सुमारे ७८ उड्डाणं होणार आहेत.

टॅग्स :विमानविएतनामहोळी 2024