Join us
Daily Top 2Weekly Top 5

संधी : माहिती तंत्रज्ञानामध्ये मिळणार ९१ हजार नोकऱ्या, प्रमुख कंपन्यांनी जाहीर केली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 05:38 IST

देशातील आघाडीची माहिती तंत्रज्ञान कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्हिसेस (टीसीएस)चे ग्लोबर एचआर हेड मिलिंद लक्कड यांनी सांगितले की, ‘टीसीएस’कडून आगामी आर्थिक वर्षात फ्रेशर्सची भरती केली जाणार आहे.

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकाटामध्ये अनेकांना बेरोजगार व्हावे लागले. मात्र, लॉकडाऊनचे निर्बंध शिथील केल्यानंतर या वर्षामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये  मोठ्या प्रमाणात नोकरभरती केली जाणार आहे. सन २०२१-२२ या कालावधीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील टीसीएस, एचसीएल टेक्नॉलॉजी, इन्फोसिस आणि विप्रो या देशातील प्रमुख माहिती तंत्रज्ञान कंपन्यांकडून सुमारे ९१ हजार नोकऱ्या उपलब्ध होण्याची शक्यता आहे. देशातील आघाडीची माहिती तंत्रज्ञान कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्हिसेस (टीसीएस)चे ग्लोबर एचआर हेड मिलिंद लक्कड यांनी सांगितले की, ‘टीसीएस’कडून आगामी आर्थिक वर्षात फ्रेशर्सची भरती केली जाणार आहे. कंपनी यंदाच्या वर्षात सुमारे ४० हजार नवीन नोकऱ्या देणार असून त्या कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे दिल्या जाणार आहेत.

गेल्यावर्षीही इतक्याच नोकऱ्या उपलब्ध केल्या होत्या. एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनीकडून आगामी आर्थिक वर्षात १५ हजार उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यावर्षी कंपनीने १२ हजार कॅम्पस हायरिंग केले होते. गेल्या वर्षी कंपनीने ७० टक्के भारतात आणि ३० टक्के परदेशातून भरती केली होती. आता भारतातूनच मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार असल्याची माहिती एचसीएलचे अप्पाराव यांनी दिली.

 

टॅग्स :नोकरीकर्मचारीमाहिती तंत्रज्ञान