Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 12:06 IST

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला होता. यावेळी भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवून पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले होते.

जम्मू-काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू होता, भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवून  पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला. या तणावा दरम्यान, तुर्कस्तानने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्यात तुर्कस्तानचे ड्रोन वापरल्याचे समोर आले. दरम्यान, आता पाकिस्तानची जवळीक तुर्कस्तानच्या अंगलट आल्याचे पाहायला मिळाले आहे. 

काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...

पाकिस्तानसोबतच्या तणावानंतर सोशल मीडियावर भारतीयांनी पाकिस्तानविरोधात आणि पाकिस्तानला ज्या देशांनी पाठिंबा दिला होता, त्या देशांच्याविरोधात मोहिम सुरू केली होती. तुर्कस्तानला भारतीय मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी जातात. सोशल मीडियावर विरोधात चालवलेल्या मोहिमेनंतर त्यांच्या भारतीय पर्यटकांमध्ये मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. 

२४ टक्क्यांची घट

भारतीय पर्यटकांचा रोष आणि सोशल मीडियावरील बहिष्कार मोहिमेमुळे तुर्कीच्या पर्यटन उद्योगाला मोठा धक्का बसलाय. मिळालेल्या माहितीनुसार, मे २०२५ मध्ये तुर्कस्तानला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत २४% ची मोठी घट झाली आहे.

"ऑपरेशन सिंदूर" दरम्यान तुर्कस्तानने भारताविरुद्ध दिलेले विधान आणि पाकिस्तानच्या बाजूने केलेल्या भूमिकेमुळे भारतीयांनी बहिष्कार टाकला. त्यानंतर, भारतीयांनी सोशल मीडियावर #BoycottTurkey ट्रेंड सुरू केला, याचा थेट परिणाम तुर्कस्तानच्या पर्यटन क्षेत्रावर झाला.

भारतातून प्रत्येक वर्षाला तुर्कस्तानला मोठ्या प्रमाणात पर्यटक जातात. इस्तंबूल, कॅपाडोसिया आणि एंटाल्या सारखी ठिकाण फिराण्यासाठी  भारतीयांची मोठी पसंती असते. पण,तुर्कस्तानने  भारताविरुद्ध राजकीय भूमिका घेतल्यापासून, भारतीय ट्रॅव्हल एजन्सी आणि टूर ऑपरेटर्सनी तुर्कस्तान टूर पॅकेजेसच्या विक्रीत कपात करण्यास सुरुवात केली.

एका महिन्यातच बहिष्काराचा परिणाम दिसला

मिळालेल्या माहितीनुसार, मे २०२५ मध्ये भारतीय पर्यटकांच्या संख्येत २४% घट झाली, ही घट एकाच देशातून येणाऱ्या पर्यटकांच्या बाबतीत तुर्कीसाठी एक मोठी धोक्याची घंटा आहे. भारतातून येणारी ही घट बहिष्कार मोहिमेचा परिणाम स्पष्टपणे दर्शवते.

टॅग्स :भारतपाकिस्तानऑपरेशन सिंदूर